खामगाव (जि. बुलडाणा): मकरसंक्रांतीची पतंगबाजी दुर्घटनेस कारणीभूत ठरली आहे. काल दुपारी ४ वाजता स्थानिक चांदमारी भागात वीज तारांमध्ये स्पार्किंग होऊन १५ ते २0 नागरिकांचे टीव्ही व काही विद्युत उपकरणे जळली आहेत.चांदमारीतील हनुमान मंदिरानजीक काही मुले पतंग उडवित असताना एक पतंग वीज तारात अडकली. सदर पतंगाला नायलॉनचा मजबूत चायना मांजा होता. त्यामुळे अडकलेली पतंग ओढताना वीज तारांच्या घर्षणामुळे स्पार्किंंग झाले. यामुळे या भागातील १५ ते २0 जणांच्या घरातील टीव्ही संच जळले. इतरही काही विद्युत उपकरणे जळल्याची चर्चा आहे
विद्युत तारांमध्ये मांजा अडकला, १५ टीव्ही जळले
By admin | Updated: January 17, 2015 00:17 IST