शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:50 IST

कोरोनाची वाढती स्थिती पाहता महाविद्यालये थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांना प्रारंभ झाल्यामुळे साहजिकच आता महाविद्यालयेही सुरू होतील का, याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, सध्याची कोरोनाची वाढती स्थिती पाहता महाविद्यालये थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे. खुद्द अनेक प्राचार्य आणि प्राध्यापकही तुर्त विद्यार्थ्यांना एकत्र करण्याच्या मताचे नाहीत.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. त्यात बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी अशा पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच अभियांत्रिकी व अन्य फॅकल्टींचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांनी आॅनलाईन शिकवणी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होण्याची उत्सुकता खेड्यातील विद्यार्थिनींची दुहेरी अडचण महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने प्राध्यापक मंडळी आॅनलाईन पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये तालुका पातळीवर किंवा तालुक्यातील एखाद्या मोठ्या खेडेगावातही आहेत. तेथे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मोबाइल कनेक्टिव्हीटीचा मोठा सामना करावा लागत आहे. आॅनलाईन शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थिनीच्या शिक्षणाला दुहेरी फटका बसत आहे. अनेक विद्याथीर्ही आता महाविद्यालय सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्यल्प वेळ मिळत आहे. आॅनलाईन शिकविताना ग्रामीण भागातील ७० टक्के विद्यार्थी कनेक्ट होत नाही. या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लियर करताना अडचणी जातील. अर्धे सत्र संपूनही महाविद्यालय सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्था आहे. 

विद्याथी सकारात्मक तर प्राचार्यांना आदेशाची प्रतीक्षामहाविद्यालये सुरू क रण्याकरिता विद्याथी सकारात्मक आहेत. एका र्षाचा प्रश्न असल्याने महाविद्यालये लवकर सुरू व्हावे, असे त्यांना वाटते. दुसरीकडे प्राचार्य मात्र विद्यापीठाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. 

 १ सप्टेंबरपासून आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. महाविद्यालय सुरू करण्याबाबत सध्या तरी विद्यापीठाच्या गाइडलाइन आलेल्या नाहीत. शासन जेव्हा आदेश देईल, तेव्हा महाविद्यालय सुरू करण्यात येईल.- प्राचार्य निलीमा देशमुख , प्राचार्य, शिंगणे महाविद्यालय, खामगाव. 

  यावर्षी कोरोनामुळे  मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे एक वर्षांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्याकरिता महाविद्यालय सुरू व्हायला पाहीजे. - पंकज लांजूळकरविद्यार्थी, अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावcollegeमहाविद्यालय