संग्रामपूर (बुलडाणा) : साडेपाच वाजताची बस साडेसात वाजेपर्यंत आली नसल्याने धामणगाव गोतमारे, मारोड येथील विद्यार्थी-विद्यार्थींना अखेर रस्त्यावरच ठिय्या मांडल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजता दरम्यान संग्रामपूर-जळगाव रोडवरील धामणगाव फाट्यावर घडली. यावेळी जळगाव जामोदकडे जाणार्या तीन बसेस रोखण्यात आल्या हो त्या व जळगाव जामोद आगाराच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. धामणगाव गोतमारे, मारोड येथून दररोज संग्रामपूर येथे ४0 ते ५0 विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. त्यामध्ये इयत्ता पाचवी ते उच्च शिक्षण घेणार्यांची संख्या आहे. जि.प. हायस्कूल व संत गुलाबबाबा विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. त्यासाठी सकाळी जळगाव जामोद वरुन जामोद मार्गे, मारोड, धामणगाव, संग्रामपूर अशी शालेय वेळेवर बस सोडण्यात येते व सायंकाळी साडेपाच (५.३0 वा.) वरवट बकाल, संग्रामपूर, धामणगाव, मरोड अशी बसची फेरी चालविल्या जाते.परंतु गत दोन ते तीन महिन्यापासून सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेत हि बसची फेरी येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. यासाठी पालकांनी जळगाव जामोद आगार प्रमुखांना दोन वेळा निवेदन देऊन समस्या मांडल्या आहेत. तरीही जळगाव जामोद आगाराकडून याकडे लक्ष देण्यात याले नाही, आज २८ नोव्हेंबर रोजी ७ वाजेपर्यंत मुली बसची वाट पाहत भर रस्त्यावर अंधारात उभ्या होत्या. तरीही बस आलेली नाही. म्हणून संतप्त मुलींनी शालेय दप्तरासह जळगाव जामोद ते वरवट बकाल रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.
विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: November 29, 2014 00:03 IST