शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:09 IST

बुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून, या बदलामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. 

ठळक मुद्देशिष्यवृत्ती योजनेची संगणकीय प्रणाली विकसित ऑनलाइन अर्जाची ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आधार नसलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून, या बदलामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचे हे ऑनलाइन  संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले आहे; परंतु या ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांंचे शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी विविध अडचणी येत आहेत. ई-शिष्यवृत्तीच्या या प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्षात मागील वर्षीप्रमाणे विद्यार्थी नूतनीकरण करण्याची सुविधा नसल्यामुळे सर्व पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांंनी पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्याकरिता अवगत करून लेखी सूचित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता महाविद्यालयाच्या सूचना फलकांवर सूचना देणे गरजेचे आहे. कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची महाविद्यालय प्राचार्य यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याणकडून करण्यात आले आहे; मात्र अनेक शाळेत यासंदर्भात विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यात आले नाही किंवा शाळेतील सूचना फलकावर सूचनाही देण्यात आल्या नाहीत. या नवीन प्रणालीपासून विद्यार्थी अनभिज्ञ असल्याने विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी विविध अडचणी येत आहेत.

आधार नसलेल्या विद्यार्थ्यांंना अडचणीशिष्यवृत्तीची या प्रणालीमध्ये अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना अर्ज भरणे बंधनकारक आहे. ही प्रणाली आधारबेस असल्यामुळे सर्व अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेणे गरजेचे आहे; परंतु अनेक विद्यार्थ्यांंकडे अद्यापही आधार कार्ड नाही. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत.