बिबी (जि. बुलडाणा): मेहकर-औरंगाबाद राज्य महामार्गावर पिंप्री खंदारे येथे भरधाव जाणार्या ट्रकने सहावर्षीय चिमुकलीस चिरडल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता घडली. औरंगाबादवरून मेहकरकडे एम.एच.१६ क्यू.४९७९ क्रमांकाचा ट्रक वेगाने जात असताना पिंप्री खंदारे बसस्थानकाजवळ संजीवनी संतोष खंदारे (६) या बालिकेस ट्रकने जबर धडक दिल्याने तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. या बालिकेचे शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सुखदेव साहेबराव खंदारे यांच्या तक्रारीवरून, ट्रकचालक गणेश भिवसन गरकळ घुगस ता.शिरुर जि.बीड यांच्या विरुद्ध कलम २७९, ३0४ भांदविनुसार व १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.
भरधाव ट्रकने चिमुकलीस चिरडले!
By admin | Updated: February 20, 2016 02:16 IST