शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अडते अडकले शेतमाल हमीभावाच्या भोवर्‍यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:40 IST

बुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे.

ठळक मुद्देमिल्सकडून अडत्यांना २,८00 रुपये भाव माल पोहोचविण्यास ३00 रुपये खर्च

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे. तसेच  सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचविण्यासाठी येणारा खर्चही  ३00 रुपयांपर्यंत जात आहे.  हमीभाव मिळत नसल्याने शे तकर्‍यांचा रोष आणि सोयाबीन मिल्सकडून मिळणारा अत्यल्प  भाव, यामुळे अडतेच हमीभावाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमाल बाजार समितीमध्ये येत  असून, त्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु  बाजार समितीमध्ये अडते व व्यापार्‍यांकडून शेतमालाला  हमीभाव मिळत नाही. मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये प्रति िक्ंवटल हमीभाव असतानाही मुगाला ४ हजार ते ४ हजार ५00  रुपयेच हमीभाव मिळत आहे. उडिदाला ५ हजार ४00 रुपये  हमीभाव असून, सध्या २ हजार ५00 ते ३ हजार रुपयेच भाव  मिळत आहे. त्यानंतर सोयाबीनला ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठेवलेला असतानाही  २ हजार ५00 रुपयांपर्यंत भाव दिला जात  आहे. शासनाकडूनसुद्धा अडत्यांना हमीभावाने शेतमाल खरेदी  करण्याचे आदेश दिले जातात; परंतु अडत्यांनी खरेदी केलेल्या  मालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडतेसुद्धा शेतमाल  हमीभावाने खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. एफए क्यू सोयाबीनचा माल हा बाजार समितीमध्ये २ हजार ५00 ते २  हजार ५५0 रुपये क्विंटलने खरेदी केला तर तोच माल सोयाबीन  मिल्स २ हजार ७00 ते २ हजार ८00 भावाने अडत्यांना द्यावा  लागतो. त्यानंतर सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचण्यासाठी  २५0 ते ३00 रुपये खर्च लागतो. वाहन भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी, माती  डागी, आर्दता क्लेमसुद्धा करण्यात येतो. शासनाच्या हमीभावाचा  नियम मिल्सला न लावता केवळ अडते किंवा व्यापार्‍यांनाच  लावला जातो. मिल्सकडून शासनाच्या हमीभावाप्रमाणे शेतमाल  ७00 ते १२00 रुपये फरकाने खरेदी केल्या जात असल्याने  अडतेसुद्धा शासनाच्या हमीभावाप्रमाणे माल खरेदी करण्यासाठी  अडचणीत सापडत आहेत. 

धुळ्याला जातो बुलडाण्याचा माल बुलडाणा जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे. अडत व व्यापार्‍यांकडून  खरेदी केलेली सोयाबीन धुळे येथील  मिल्सला पाठविल्या जाते;  परंतु सोयाबीन मिल्सवर योग्य भाव अडत्यांना भेटत नसल्याने  अडते व व्यापारीसुद्धा शेतकर्‍यांना हमीभाव देत नाहीत.   

गरजवंतांचीच सोयाबीन बाजार समितीत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला  योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनचा  माल घरीच साठून ठेवलेला आहे; मात्र आर्थिक अडचण  असलेले शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत  आहेत. आर्थिक नड भागविण्यासाठी शेतकर्‍यांना कमी भावात  सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याने बाजार समि तीमध्ये बहुतांश गरजवंत शेतकर्‍यांचेच सोयाबीन विक्रीसाठी येत  आहे.

या कारणांमुळे मिळत नाही हमीभाव- अडत्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला मिल्सवर केवळ २  हजार ८00 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे अडते कमी  दरात सोयाबीन खरेदी करतात. - हमीभावाचा नियम हा फक्त अडते किंवा व्यापार्‍यांनाच आहे,  हा नियम कुठल्याही मिल्स वाल्याला लावला जात नाही.  त्यामुळे अडत्यांच्या मालाला भाव मिळत नाही. - मिल्सवर माल पोहोचण्यासाठी २५0-३00 रुपये खर्च आहे.  त्यानंतर मोटार भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी,  माती डागी, आर्द्रता, क्लेम करण्यात येतो.- मिल्सवर शेतमाल आल्यानंतर १0 ते १२ आर्द्रतेपर्यंतचा माल  असल्यास १ किलोचे पैसे कापण्यात येतात. त्यानंतर १२ पेक्षा  जास्त आर्द्रता असल्यास कपातही डबल होते. डागी माल  मिल्सवर आल्यानंतर कपात केली जाते. 

टॅग्स :agricultureशेती