शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:49 IST

नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे.

- ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य परिवहन महामंडळांतर्गत प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड काढण्याची मोहीम सध्या राज्यभर सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दीड हजार जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये १२ हजार ६४३ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी वृद्धांचा खडतर प्रवास सुरू असल्याचे चित्र आहे.एसटीचा प्रवास कॅशलेस पद्धतीने करण्याची घोषणा १ जून रोजी करण्यात आली होती. त्यानुसार कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना लागणाऱ्या स्मार्ट कार्डकरीता डेपोनिहाय नोंदणी करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाले आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. परंतू स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्याने बसस्थानकांवर जेष्ठ नागरिकांच्या रांगा कायम दिसून येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सात आगारांतर्गत १४ हजार ७०९ स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या १२ हजार ६४३ आहे. काही बसस्थानकावर तर सकाळी सात वाजेपासून जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी रांगेत उभे राहत आहेत. काही बसस्थानकावर दुपारी दोन वाजेनंतर स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. परंतू ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना तोपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे सध्या अनेक जेष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डची नोंदणीच केली नाही. नोंदणी केल्यानंतर प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते ५.३० वाजेपर्यंत कार्ड वाटप करण्यात येते.

आगार निहाय स्मार्ट कार्ड नोंदणीबुलडाणा आगारामाध्ये एकूण २ हजार ९२९ स्मार्ट कार्ड नोंदणी झाली आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिक २४७७ व विद्यार्थी ४४९ आहेत. चिखली आगारात एकूण १ हजार ५८६ नोंदणी झाली आहे. त्यात जेष्ठ नागरिक १४६१ व विद्यार्थी १२५ आहेत. जळगाव जा. आरामध्ये एकूण १ हजार ८३३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक १७९६ व विद्यार्थी ३७ आहेत. खामगाव एकूण १ हजार ७३३ असून, जेष्ठ नागरिक १७१८ व विद्यार्थी १५ आहेत. मेहकरमध्ये एकूण २ हजार १७३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक १०१९ व विद्यार्थी १ हजार १५४ आहेत. मलकापूर एकूण ३ हजार ५२३ नोंदणी झाली असून, जेष्ठ नागरिक ३५२० व विद्यार्थी ३, शेगाव एकूण ९३४ नोंदणी झाली आहे. त्यापैकी जेष्ठ नागरिक ६५२ व विद्यार्थी २८३ आहेत.

दोन हजार विद्यार्थ्यांची नोंदजेष्ठ नागरिकांबरोबच विद्यार्थ्यांनाही स्मार्ट कार्ड देण्यात येते. आतापर्यंत स्मार्ट कार्डसाठी जिल्ह्यात दोन हजार ६६ विद्यार्थ्यांनी नोंद केली. त्यात मलकापूर आगारामध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ तीन विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक मेहकर आगारामध्ये ११५४ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.

जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सध्या दीड हजारापर्यंत नोंदणी पूर्ण झाली असून, जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घ्यावा.- ए. यू. कच्छवे,विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी