शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात ‘एसपी खुर्ची’साठी संघर्ष; जिल्हा पोलिस दलात गोंधळाचे वातावरण

By संदीप वानखेडे | Updated: May 30, 2025 16:17 IST

Buldhana: बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जिल्हा प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसपी विश्व पानसरे आणि नवीन नियुक्त एसपी नीलेश तांबे यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे पोलिस दलात गोंधळाची स्थिती आहे.

बुलढाणा - जिल्हा पोलिस अधीक्षक पदासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जिल्हा प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसपी विश्व पानसरे आणि नवीन नियुक्त एसपी नीलेश तांबे यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे पोलिस दलात गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेफळे हे तातडीने पाेलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. ते या गाेंधळावर ताेडगा काढण्यासाठी चर्चा करीत आहेत.

शुक्रवारी (दि. ३०) सकाळपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नाट्यमय घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वीच बदली झाल्यानंतर न्यायालयीन स्थगिती मिळवणारे पानसरे अचानक गणवेशात कार्यालयात दाखल झाले आणि कोणतेही अधिकृत चार्ज हस्तांतरण न करता त्यांनी खुर्ची ताब्यात घेतली.

दुसरीकडे, शासन आदेशानुसार कार्यभार स्वीकारलेले नीलेश तांबे सध्या ॲडिशनल एसपी बी. बी. महामुनी यांच्या दालनातूनच काम पाहत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आहे. ‘खरे एसपी कोण?’, ‘आदेश कुणाचे पाळायचे?’ अशा प्रश्नांनी पोलिस दलात संभ्रम वाढला आहे. दरम्यान, यावर ताेडगा काढण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेफळे पाेलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले हाेते.

टॅग्स :Policeपोलिसbuldhanaबुलडाणा