शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा बँक योजनेला बळ;  बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला ३२ लाख ८९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 13:32 IST

खामगाव : लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू झालेली मुद्रा बँक योजना जिल्ह्यात थंडबस्त्यात पडली होती. आता मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळावा, यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांना १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार असून बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला ३२ लाख ८९ हजार ५०० रुपये आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता मुद्रा बँक योजनेला बळ मिळाले आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ मध्ये मुद्रा बँक योजना सुरू केली होती. परंतू वर्ष उलटण्याच्या आतच मुद्रा बँक योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याचे पाहावयास मिळाले. राज्यातील चार जिल्ह्यातील मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीस १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार आहे.

खामगाव : लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू झालेली मुद्रा बँक योजना जिल्ह्यात थंडबस्त्यात पडली होती. आता मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळावा, यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांना १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार असून बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला ३२ लाख ८९ हजार ५०० रुपये आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता मुद्रा बँक योजनेला बळ मिळाले आहे.लघु उद्योग, छोटे कारखानदार आणि दुकानदार यासह बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ मध्ये मुद्रा बँक योजना सुरू केली होती. या योजनेतून सुरूवातीला लघु उद्योजकांना १० लाखापर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात आले; परंतू वर्ष उलटण्याच्या आतच मुद्रा बँक योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याचे पाहावयास मिळाले. अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास नकार दर्शविल्याने जिल्ह्यात मुद्रा बँक योजना थंडबस्त्यात पडली होती. मात्र आता पुन्हा शासनाने बुलडाणा जिल्ह्यात मुद्रा बँक योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी बळ दिले आहे. मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावा, यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील चार जिल्ह्यातील मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीस १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी ३२ लाख ८९ हजार ५०० रुपये, नाशिक १९ लाख ५४ हजार ८७४, सातारा २० लाख व रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३३ लाख ६० हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. राज्यातील चार जिल्ह्यात निधी देण्यात येत असून त्यात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्यातील लघु उद्योजक व बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.नियंत्रण अधिकाऱ्यांना ठेवावा लागणार हिशोबमुद्रा बँक योजनेचा निधी कोषागार कार्यालयातून आहरित करण्यााठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे नियंत्रण अधिकारी राहणार आहेत. त्यानंतर निधीच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणजे मुद्रा बँक योजनेच्या नियंत्रण अधिकाºयांवर राहणार आहे. निधीचा हिशोब ठेवून खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला द्यावी लागणार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना