शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

वादळाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 14, 2014 23:42 IST

संध्याकाळी सुमारे दीड तास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टीनपत्रे उडून घराची पडझड झाली तसेच विजेचे खांब सुध्दा तुटले.

सोनाळा : गावासह परिसरात ११ जून रोजी संध्याकाळी सुमारे दीड तास वादळाने थैमान घातल्याने गावातील शेकडो घरावरील टीनपत्रे उडून घराची पडझड झाली तसेच विजेचे खांब सुध्दा तुटले.

त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. खंडित विद्युतपुरवठय़ाचे काम संथगतीने सुरु असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याने सहाही प्रभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील जलसाठय़ात पाण्याचा थेंबही नसल्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता हिवरखेड व बावनबीर रस्त्यावरील शेगावला जाणार्‍या पाईपलाईन वरील वॉलवर जावे लागत आहे. बागायती कपाशीला विद्युत मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ११ रोजी सायंकाळी वादळाने गावात थैमान घातल्याने सोनाजी नगर, देशमुख प्लॉट, पंचशील नगर, झाडीपुरा, डोंगरपुरा, पिंगळीवेस, सायखेड वेस, भीमनगर, प्रकाशबाबा चौक, तुकाराम चौक, लंबोधर नगर, वाल्मीक, अन्नाभाऊ साठे नगर आदी भागातील ग्रामस्थांचे घरावरील टीनपत्रे उडाली तर असंख्य घराची पडझड होवून विद्युत पोलही मोडकळीस पडली. नागरिकांना सतत तीन दिवस जागून रात्र काढावी लागली. विद्युत पुरवठय़ाचा फटका तिसर्‍या दिवशीही नागरिकांना बसला. गावाच्या पाणीपुरवठय़ाच्या टाकीत ठणठणाट असल्याने ग्रामस्थांना हातपंपाचा सहारा घ्यावा लागत आहेत. गावातील सर्वच हातपंपावर महिला, पुरुष, आबालवृध्द, मुले यांची भाऊ गर्दी होत आहे. तर असंख्य ग्रामस्थ हिवरखेड व बावनबीर रस्त्यावरील वारी येथून शेगावला जाणार्‍या पाईपलाईन वरील वॉलवर पाण्याकरिता सायकल, मोटारगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी वाहन आदींचा उपयोग करुन पाणी आणत असल्याचे चित्र आहे. गावात विद्युत नसल्याने ग्रामस्थ गावाजवळील टुनकी, बावनबीर, सगोडा गावातील पिटगिरणीवरुन दळण दळून आणत आहेत. जनावराची स्थिती भयानव झाली आहे. ११ रोजी गावात वादळाने थैमान घातले त्यामध्ये गावातील चार रोहीत्र बंद पडली. त्यामध्ये जयस्वाल डी.पी., सायखेड वेस डी.पी. यांना डी.पी. मटन मार्केट डीपी .आदींचा समावेश आहे. या तिन्ही डि.पी.चे काम तिसर्‍या दिवशी संतगतीने सुरु होते. तिसर्‍या दिवशीही गावात दुपारपर्यंत विद्युतपुरवठा बंद होता. वरवट बकाल येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा विद्युतपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने वीज वितरण कंपनीने टुनकी येथील ३३ के.व्ही.मधून सोनाळा ३३ केव्हीला विद्युतपुरवठा जोडण्याचे काम युध्द पातळीवर संथगतीने सुरु होते. यामध्ये दोन दिवस केवळ १0 कामगार हे काम पार पाडत आहेत. शेतातील विद्युतपुरवठा ही खंडित असल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात बागायती कपाशी पेरलेली आहे. बागायती कपाशीला याचा फटका बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोनाळा गावातील व शेतातील विद्युतपुरवठा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. शेतीच्या मशागतीच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.** सोनाळा तलाठय़ांची बदलीची मागणीतीन महिन्या अगोदर गाव परिसरात गारपिटीने थैमान घातले होते. मात्र तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी कार्यालयात बसून सर्वे केला होता. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असतानाही सरसकट शासनाला ५0 टक्केच्या आत नुकसान दाखवून शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवले होते. ११ रोजी गावात भूमिहिन, गरीब नागरिकांचे टीनपत्रे उडून गेली. घरांची पडझड झाली. तलाठी खेडकर यांनी एकाच दिवसात संपूर्ण गावाचा सर्वे चार वाजेपर्यंत आटोपता घेतल्याने गावातील गरीब, भूमिहिन, शेतमजुराचे नाव सर्वेत असणार का या भावड्या आशेत आपतग्रस्थ पडले आहेत. तलाठी खेडकर व चव्हाण यांची बदलीची मागणी जोर धरीत आहे.