शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

सैनिकाला ध्वजारोहणास मज्जाव! सरपंच, उपसरपंचावर गुन्हे दाखल; स्वातंत्र्यदिनी घडला होता प्रकार  

By सदानंद सिरसाट | Updated: September 3, 2023 18:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते.

मलकापूर (बुलढाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावातील लष्करी जवान, माजी सैनिक, वीर पत्नी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन केले होते. मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाने जवान तसेच त्याच्या आईला त्यापासून मज्जाव केल्याने दाखल तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सैनिकाची आई मुक्ताबाई वसंता इखारे (५५) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये मुलगा तुषार वसंत इखारे हा सशस्त्र सीमा बल ८ बटालियन खपरील पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहे. १३ ऑगस्ट २०२३ रोजी तो रजेवर आला.

 तेव्हापासून तो गावातच आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व म.पू.माध्यमिक शाळा शिराढोण येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश, या कार्यक्रमांतर्गत देश पातळीवर माजी सैनिक व भारतीय सैनिक तसेच वीर पत्नीच्या हस्ते मान सन्मानाचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मुलाला कार्यक्रमापासून वंचित ठेवले. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता तुम्हाला मान देणार नाही, असे म्हटले. तसेच अपमानित करून हाकलून दिले होते. याबाबत ॲड. प्रफुल्ल तायडे यांच्यासह नागरिकांनी १८ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांनाही निवेदन दिले.

त्यानंतर याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी शिराढोण ग्रामपंचायत सरपंच उज्वला मनीष पाटील, उपसरपंच पद्मिनी रघुनाथ नारखेडे, शारदा प्रदीप वराडे, बादल रवींद्र पाटील, ग्रामसेवक रमेश राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश प्रल्हाद पाटील, शिक्षण समिती अध्यक्ष प्रशांत प्रकाश पाटील, पोलीस पाटील विनोद पद्माकर पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६०,१४३ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी