आमदार गोपीचंद पडळकर विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात सिंदखेडराजा येथून मॉँ जिजाऊ दर्शन घेऊन करण्यात आली. देऊळगाव राजा विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी ज्येष्ठ नेते शिवदास बिडकर, माजी पोलीस अधिकारी दीपक बोराडे, डॉ.सुनील कांयद, डॉ.गणेश मान्टे, तालुका अध्यक्ष विठोबा मुंढे,बाळासाहेब तायडे,धनगर समाजाचे युवा नेते प्रल्हाद सोरमारे, राजेंद्र टाकळकर, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, डॉ.शंकर तलबे,निशिकांत भावसार, मल्हार वाजपे, राजेश भुतडा, धर्मराज हनुमंते,रामदास गुरव,सुनील मतकर,भगवान जोशी,जगन कुरधने, पवन मतकर, राजू गाटोळे, योगेश मिसाळ, अनिल वैद्य आदी उपस्थित होते.
आ.पडळकर पुढे म्हणाले की, दलालांच्या जोखाडातून मुक्त करणारे शेतकरी हिताचे कायदेच मोदी सरकारने आणले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारकडून कोरोना सारख्या महामारीत गरीब आणि गरजूंना न्याय देता आलेला नाही. कर्नाटक राज्यातील गोरगरिबांना मदतीचा हात देत दहा हजार कोटींचा निधी जाहीर केला, परंतु महाराष्ट्र सरकार कोणतीच मदत करताना दिसून येत नाही. तसेच मेंढपाळांना धनगर समजू नका त्यांना व्यापारी समजून त्यांना व्यापार वाढविण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन द्या आणि त्यांच्यावर होणारे जीवघेणे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्या नाही तर याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागणार असा इशारा त्यांनी दिला.