बिबी (बुलडाणा), दि.२३-: ब्राह्मणचिकना गावाजवळ अनोळखी तरुणाची दगडाने ठेचून व गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी गुरुवारला उघडकीस आली.ब्राह्मणचिकना परिसरात अनोळखी इसमाची गळा आवळून दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. महामार्गापासून वीस फूट अंतरावरील शेतात सदर मृतदेह आढळून आला. ब्राह्मणचिकना येथील तंटामुक्ती अध्यक्ष भगवान गायकवाड यांनी ही माहिती बिबी पोलीस स्टेशनला दिली. सदर इसमाची गळफास घेऊन हत्या केल्याची व ओळख पटू नये, यासाठी दगडाने चेहर्यावर वार करून सदर इसमाचा चेहरा विद्रुप करण्यात आला. यामुळे या इसमाची ओळख पटवने अवघड झाले आहे. या इसमाचे वय अंदाजे ४0 वर्ष असून, काळी पॅन्ट व पांढरा शर्ट अंगात आहे.
दगडाने ठेचून इसमाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:37 IST