खामगाव : यावर्षी एप्रिल व मे महिन्यात पार पडलेल्या लग्नसराई त खामगाव आगाराला प्रासंगीक करारातून ८ लाखाचे उत्पन्न प्रा प्त झाले आहे. लग्नासाइी ६९ बसगाड्यासाठी करार करण्यात आला होता. यामुळे राज्य परिवहन महामंडाच्या आर्थीक उत्पन्नात भर पडली आहे. प्रवाशांना सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ कार्यकरत आहे. प्रवाशी भाड्यात देण्यात येणार्या सुविधाबरोबरच प्रासंगीक करारतही एसटीची साथ लाभली आहे. विविध राजकीय पक्षातील मोठय़ा नेत्यांच्या सभा तसेच विद्यार्थ्यांच्या सहलीकरिता एसटीला प्राधान्य दिले जाते. लग्नसमारंभाकरितासुद्धा एसटी सिद्ध असतेच. यावर्षी खामगाव आगाराने एप्रिल महिन्यात २५ बसगाड्यासाठी प्रासंगीक करार केला होता. या करारापोटी ५ हजार ५७ किलोमिटर धावून २ लाख ३७ हजार ५८२ रुपयाचे उत्पन्न मिळाले तर मे महिन्यात लग्नतिथी दाट असल्याने ४४ बसगाड्यांचा करार झाला होता. यामध्ये १२ हजार १८३ किलोमिटर बस करारातून ५ लाख ६0 हजार ४१८ रुपयाचे उत् पन्न प्राप्त झाले आहे. बसप्रवास हा ४६ रुपये प्रतिकिलोमिटर दराने आकारण्यात आला. या प्रासंगीक करारामुळे खामगाव आगाराला जवळपास ८ लाखाचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
एसटीला लग्नसराई पावली
By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST