शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sting operation : खामगावात बाजार समिती संचालकासमोर ‘उलटी हर्राशी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:20 IST

खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत बाजार समिती प्रशासनाबाबत काही शेतकºयांनी बुधवारी तक्रार दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अखेर संबधित शेतकºयांनी लोकमतकडे धाव घेतली. सध्या बाजारपेठेत गहू, तूर, हरभरा, सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय भूईमुगाच्या शेगा, उडीद, मुग, करडई विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. वास्तविक पाहता जिल्हयातील सर्व बाजार समित्यामध्ये सरळ हर्राशीद्वारे शेतकºयांचा माल खरेदी करण्यात येतो. नियमानुसार शासकीय हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली व्यापाºयांनी लावली पाहिजे. यातून शेतकºयांना जास्तीत जास्त भाव मिळतो. परंतू खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उलटी हर्राशी सुरु केली असून यातून शेतकºयांनी लुबाडणूक व आर्थीक लुट होत आहे. जे शेतकरी विरोध करतात त्यांचा माल सुद्धा व्यापारी खरेदी करीत नसल्याची मनमानी करीत आहेत. यामुळे शेतकºयांची कोंडी होत आहे. बुधवारी, १३ मार्चरोजी खामगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होती. जालना, बुलडाणा, अकोला, परभणी या जिल्हयातून शेतकºयांनी माल विक्रीस आणला होता. सकाळपासून उलटी हर्राशी सुरु असल्याचे शेतकºयांचे लक्षात आले. त्यामुळे काही शेतकºयांनी माल विकण्यास विरोध दर्शवला. तर काहींही बाजार समिती संचालकाकडे धाव घेतली. मात्र त्यांचे कुणीही ऐकले नाही. त्यानंतर हताश झालेले शेतकरी दुपारी ३ वाजेपर्यंत बसून होते. काही व्यापाºयांनी दुपारी ३ नंतर हर्राशीला सुरवात केली. परत उलटी हर्राशीचा तोच प्रकार सुरुच होता. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकºयांकडे पैसा नाही अशा अवस्थेत मुलींचे लग्न, शिक्षणाचा खर्च कसा भागवावा ही विवंचना शेतकºयांना आहे.

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती