शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sting Operation : मापात ‘पाप’ करून शेतकऱ्यांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:27 IST

कापसाने भरलेले वाहन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति वाहन १ ते दीड क्विंटल कापसाची चोरी होत असल्याचे दिसून येते.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथे ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. मापात पाप करून कापसाची चोरी करण्याचाच हा प्रकार असून यामुळे शेतकºयांना प्रतिवाहन ५ ते ६ हजार रूपयांपर्यत नुकसान सहन करावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत स्टींग’ आपॅरेशनमध्ये उघडकीस आला आहे.किमान आधारभूत दराने खामगावात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खामगावात ६ ठिकाणी शेतकºयांचा कापूस खरेदी केल्या जात आहे. यापैकी एमआयडीसी भागात ३ आणि तलाव रोड भागात ३ ठिकाणी गोडाऊन भाड्याने घेण्यात आले आहेत. कापसाचे किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल ५५०० रूपये आहेत. असे असले तरी मालातील आर्द्रता बघून भाव देण्यात येत आहेत. गत काही दिवसांपासून खरेदी करण्यात आलेल्या कापसाला ५ हजार २३५ ते ५४५० रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव शेतकºयांना देण्यात येत असल्याचे दिसून येते. दरम्यान सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. शेतकºयाने कापसाने भरलेले वाहन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति वाहन १ ते दीड क्विंटल कापसाची चोरी होत असल्याचे दिसून येते. उताºयाच्या नावाखालीसुध्दा प्रति वाहन २ ते ५ किलो कापूस काढण्यात येतो. विशेष म्हणजे या कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयच्या अधिकाºयांपेक्षा खासगी व्यापाºयांचीच जास्त चलती असल्याचे दिसते. व्यापारी सांगतील त्या वाहनाचे मोजमाप लवकर होते. इतर वाहनांचे मोजमाप होण्यास उशीर लागतो. विशेष म्हणजे वाहनाचे मोजमाप झाल्यानंतर वाहनातून कापूस खाली करतानाही दुजाभावाची वागणूक मिळते. व्यापाºयांच्या जवळच्या व्यक्तीची कापसाची ट्रॉली असेल तर त्याला हॉयड्रॉलीकने कापूस खाली करण्याची परवानगी मिळते. इतर शेतकºयांना मजूर लावून कापूस खाली करावा लागतो. मजुरांकडून कापूस खाली करण्यासाठी १५ रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे मजुरी अदा करावी लागते. याशिवाय १० रूपये प्रतिक्विंटनुसार दलाली वेगळीच. एकंदरीत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर दुजाभावाची वागणूक मिळते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे व शेतकºयांची लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.असे केले स्टींग!सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची फसवणूक सुरू आहे, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर प्रतिनिधीने प्रत्यक्ष कापूस खरेदी केंद्रार जाऊन पाहणी केली असता, हा सर्व प्रकार समोर आला. प्रति वाहन १ ते दीड क्विंटलची हेराफेरी, उताºयाच्या नावाखाली २ ते ५ किलो कापसाची मागणी तसेच वाहन खाली करताना होणारा दुजाभाव असे सगळे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे काही शेतकºयांनी उताºयासाठी कापूस देण्यास विरोधही केला. परंतु त्यांचा कोणी वाली नसल्याचे दिसून आले.अशी होते कापसाची चोरी!वाहनाचे मोजमाप करताना आधी कापसासह वाहन काट्यावर उभे करण्यात येते. याची नोंद घेऊन वाहन कापूस खाली करण्यासाठी नेण्यात येते. त्यानंतर रिकाम्या वाहनाचे मोजमाप करत असताना त्या वाहनासोबत एक व्यक्ती तसेच काही वजन मापे काट्यावर ठेवण्यात येतात. यामुळे रिकाम्या वाहनाचे वजन साधारणपणे ६० ते ७० किलोने वाढविले जाते.

काट्यावर उभे राहून वजन वाढविण्याचा प्रकार गंभीर आहे. सीसीआयचे अस्थायी कर्मचारी दोषी असतील तर चौकशी करून त्यांच्यावरकारवाई केली जाईल. उताºयाबाबत शनिवारी तक्रार प्राप्त झाली आहे.-सतीश देशमुखव्यवस्थापक, सीसीआय, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी