शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्व्हेंटकडे जाणारे पाऊल आता ‘सीबीएसई’कडे!

By admin | Updated: May 25, 2017 00:30 IST

अमरावती विभागात सीबीएसईच्या ४७ शाळा : सीबीएसईमुळे कॉन्व्हेंटवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अमरावती विभागामध्ये सीबीएसई बोर्डाच्या जवळपास ४७ शाळा आहेत. या शाळेत इंग्रजीचे प्रभुत्व असल्याने पालकांचा सीबीएसईच्या आभ्यासक्रमाकडे ओढा आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदमधून कॉन्व्हेंटकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाऊल आता सीबीएसईकडे वळत आहे. सीबीएसईमुळे कॉन्व्हेंटवरही संक्रांत आली असून, कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनाही विद्यार्थी शोध मोहीम राबवावी लागत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कॉन्व्हेंटच्या पाठोपाठ आता सीबीएसई संस्कृती रुळत आहे. कॉन्व्हेंटने इंग्रजी माध्यमाचे शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांना चांगलाच भोगावा लागत आहे. परंतु पूर्वी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचा ओढा कॉन्व्हेंटकडे होता; मात्रा आता या परिस्थितीमध्ये बदल होत आहे. आता कॉन्व्हेंट संस्कृतीच्या पलीकडे सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्र राज्यात सीबीएसई बोर्डाच्या जवळपास १५ ते १६ हजार शाळा असून, पश्चिम विदर्भात ४७ शाळा आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ११, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम पाच, अमरावती १० व यवतमाळ जिल्ह्यात १४ शाळा सीबीएसई बोर्डाच्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्याच शिक्षकांचा भरणा केला जात असून, या शाळांचे आकर्षण पालकांना अधिक आहे. त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व असल्याने या शाळेकडे पालकांचा कल दिसून येतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदकडून कॉन्व्हेंटकडे वळणारे मुलं, सीबीएसई माध्यमाच्या शाळेकडे वळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. कॉन्व्हेंटपेक्षा सीबीएसई माध्यमाच्या शाळेतील प्रवेश शुल्क जास्त असूनही पालक ते शुल्क भरण्यास तयार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळा प्रत्येक शहराच्या ठिकाणी निर्माण होत असल्याने पालकांनाही आपल्या पाल्याला सीबीएसई बोर्डाचे शिक्षण देणे सोईचे झाले आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळेत केवळ शहरातीलच मुलांना टाकले जात नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होत आहे. त्यामुळे कॉन्व्हेंटमधील मुले आता सीबीएसईमध्ये जात असल्याने कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना विद्यार्थी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूकसीबीएसई बोर्डाच्या शाळेकडे विद्यार्थी जात आहेत. त्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये यापूर्वी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जायचे असेल, तर कॉन्व्हेंटमधून शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी संस्थाचालक व शिक्षकांकडून अडवणूक होत आहे. सीबीएसईच्या शाळेत जाण्यासाठी तयार असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे दाखले कॉन्व्हेंटच्या शाळेत अडकून पडले आहेत. ‘सीबीएसई पॅटर्न’च्या नावाखाली पालकांची फसवणूकअमरावती विभागामध्ये जवळपास ४५ शाळा सीबीएसई बोर्डाच्या आहेत. परंतु शहराच्या ठिकाणी असलेल्या अनेक शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले जात आहेत. ‘सीबीएसई पॅटर्न’च्या नावाखाली पालकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या पाल्याचा प्रवेश करण्यापूर्वी शाळांची योग्य खात्री करावी. तसेच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळा सीबीएसई पॅटर्न आहे का, त्यावरील शिक्षकांचे शिक्षण आदी बाबींची सखोल चौकशी करणे गरजेचे झाले आहे.