शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

बुलडाणा जिल्हय़ातील मार्गांना मिळणार राज्य महामार्गाचा दर्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:56 IST

बुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ७३३ किमी लांबीचे सातही विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जांचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत आहे. या प्रमुख जिल्हा मार्ग आणि अन्य जिल्हा मार्गांना येत्या काळात प्रमुख राज्य महामार्गाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७३३ किमी रस्त्यांचा दर्जा बदलण्याचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित करण्यात आल्याने जिल्ह्यात राज्य महामार्गांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ७३३ किमी लांबीचे सातही विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जांचा प्रस्ताव सध्या तयार करण्यात येत आहे. या प्रमुख जिल्हा मार्ग आणि अन्य जिल्हा मार्गांना येत्या काळात प्रमुख राज्य महामार्गाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यासंदर्भात आता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता घ्यावी लागणार आहे.जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत औरंगाबाद-जालना-चिखली-बुलडाणा-मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. यासोबतच खामगाव, बुलडाणा, शेगाव, लोणार, मेहकर, देऊळगावराजा शहरांनाही ७५३ ई, ७५३ एम, ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्र्गांची लांबी ५५८ किलोमीटर झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि राज्य मार्गांची संख्या व लांबी कमी झाली आहे. या रस्त्यांचा मोठा अनुशेष त्यामुळे निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या लांबीपैकी २६८.८९ किमीचे रस्ते प्रत्यक्षात महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आले असले, तरी २८८.९0 किमी लांबीचे रस्ते अद्यापही हस्तांतरित करण्यात आलेले नाही. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग बनणार राज्य महामार्गमलकापूर-जालना हा प्रमुख राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बनल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य जिल्हा मार्ग, अन्य जिल्हा मार्ग काही ग्रामीण रस्त्यांचे भाग्य आता उजळले आहे. हे  रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करावे लागणार आहे. त्याशिवाय या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा मार्ग बिकट आहे. सातही मतदार संघातील प्रमुख जिल्हा, ग्रामीण रस्त्यांचा यात समावेश आहे. जवळपास ७३३ किमी लांबीचे हे रस्ते आहेत. यात शेंदूर्जन-सायाळा-मेहकर, देऊळगाव राजा बोराखेडी बावरा, गोमेधर- पिंप्री माळी-मेहकर, लोणार-पिंप्री खंदारे, दाताळा-दाभाडी-पोफळी-कोर्‍हाळा बाजार-पाडळी-धाड, परडा-कोथळी, धामणगाव बढे-रिधोरा-पोफळी-कोल्हा गवळी-आव्हा-युनूसपूर-दहीगाव यास जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा यात समावेश आहे. मतदारसंघनिहाय हे रस्ते यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

जि. प. ठरावाची गरजजिल्हा परिषदेच्या अखत्यारितील हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरीत करण्यासाठी प्रमथ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यासाठीचा ठराव घ्यावा लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही तो चर्चिला जाणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषदेला सूचना दिल्या असून, अनुषंगिक कार्यवाहीबाबत निर्देशितही केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता जिल्हा परिषदेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

आ.सपकाळ यांचा पुढाकारप्रकर्षाने हा मुद्दा बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी लावून धरला आहे. यासंदर्भात बुलडाणा विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी त्यांची मागणी होती. त्या दृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. दाताळा-दाभाडी-पोफळी-पाडळी-धाड हा रस्ता मतदार संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रमुख राज्य महामार्ग, राज्य मार्गाच्या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी रेटला आहे.-