शेगाव : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक अनुदानास पात्र तथा अनुदान पात्र न झालेल्या शाळांना हिवाळी अधिवेशनापूर्वी घोषित करून त्यांना अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्त्वात मंगळवारपासून शेगाव ते नागपूर पायी दिंडी आंदोलनास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या २00 शिक्षकांनी ह्यभीक मागोह्ण आंदोलनासही प्रारंभ केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत वि.जा.भ.ज. कनिष्ठ महाविद्यालयांवर आणि विनाअनुदानीत शाळेवर काम करणार्या प्राध्यापक आणि शिक्षकांची अवस्था राज्यात दयनिय झालेली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, यासाठी वेळोवेळी मागणी करूनही शासनावर कुठलाच फरक पडलेला नाही. त्यामुळे मंगळवारी शेगावातून या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला आहे. या पायदळ दिंडीमध्ये राज्यातील चार आमदारांसह २00 शिक्षकांचा समावेश आहे. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ. कपिल पाटील, आ. विक्रम गाळे यांच्या नेतृत्त्वात वर्धमान जैन भवनासमोरून या दिंडीस प्रारंभ झाला. या पायी दिंडी आंदोलनात समितीचे विभागीय अध्यक्ष सय्यद राजीक, ज.मो. अभ्यंकर, सरचिटणीस पद्माकर इंगळे यांच्यासह २00 शिक्षकांचा समावेश आहे. दुपारी खामगाव येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका स्वाती कुळकर्णी यांच्या हस्ते आमदारांचे औक्षण होऊन दिंडीला सुरुवात झाली. दिंडी ११ डिसेंबरला नागपूरला पोहोचणार आहे.
शिक्षकांच्या दिंडीस प्रारंभ
By admin | Updated: December 2, 2015 02:26 IST