शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बुलडाण्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रियेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:13 IST

बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. कचºयापासून खतनिर्मिती करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर आवश्यक असलेले यंत्र गुरुवारी शहरात दाखल झाले आहे. या यंत्राद्वारे कचरा बारीक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर आणखी प्रक्रिया करून त्याचे खतात रूपांतर करण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कचरा डेपोमुळे हनवतखेडवासीयांना होत असलेला त्रास आता काहीअंशी कमी होणार आहे.बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. ही जागा मर्यादीत असल्याने या जागेवर कचºयाचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत. नवीन कचरा टाकताना तो नेमका कुठे टाकावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो. एवढेच नव्हे हा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. यामुळे येथून जवळच असलेल्या हनवतखेड येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींबर तोडगा म्हणून पालिकेच्या वतीने या कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होताना दिसत आहे. केवळ या कचºयाची विल्हेवाट लावणे एवढाच उद्देश नसून त्याचा योग्य विनियोग करण्याबाबतही नियोजन पूर्ण झाली आहे.शहरात गुरुवारी कचºयापासून खतनिर्मितीसाठी मशिन कार्यान्वीत करण्यात आली आहे. या मशीनची क्षमता ३५० टीपीएस एवढी आहे. या माध्यमातून डंपींग ग्राऊंडमध्ये साठलेल्या कचºयाची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. सध्या कचरा बारीक करण्यास सुरुवात झाली असून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे. याकरीता शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नरत आहे.शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. बुलडाणा पालिकेकडून या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने शहराच्या स्वच्छतेतदेखील या माध्यमातून विशेष भर पडणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. ठराविक अंतरावर हव्या कचरा कुंड्याघरातील कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी शहरात घंटागाड्यांची व्यवस्था आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी उपायोजना पालिकेच्या वतीने करण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला दिसून येतो. हा कचरा एकत्रिपणे गोळा करण्यासाठी पालिकेने ठराविक अंतरावर कचराकुंड्या लावणे गरजेचे आहे. या कचराकुंड्या लावल्यानंतर नागरिकांनी देखील आपली जबाबदारी म्हणून कचरा हा कचराकुंडीतच टाकणे अपेक्षित आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा