शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वितरणाची कार्यवाही त्वरित सुरू करा - फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:22 IST

बुलडाणा: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्हय़ातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. सोबतच पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहे. परिणामी या बँकांनी पीक कर्ज वाटप करताना त्यात सुसूत्रता आणि सहजपणा ठेवावा, असे निर्देशही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरुवारी दिले आहे.

ठळक मुद्देकर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी सुसूत्रता ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्हय़ातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. सोबतच पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहे. परिणामी या बँकांनी पीक कर्ज वाटप करताना त्यात सुसूत्रता आणि सहजपणा ठेवावा, असे निर्देशही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरुवारी दिले आहे.खामगाव येथील नांदुरा मार्गावर असलेल्या तुळजाई हॉलमध्ये गुरुवारी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी तातडीने जिल्हय़ातील बँक अधिकार्‍यांची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन त्यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदिंह दुबे, आ. आकाश फुंडकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुभाष बोदांडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, अग्रणी बँकेचे प्रभाकर श्रोते प्रामुख्याने उपस्थित हाते.जिल्हय़ाचे खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना कर्ज वाटपचे उद्दिष्ट हे १ हजार ७४५ कोटी रुपयांचे असून, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा सहकरी बँकेने शेतकर्‍यांना कर्जवाटपाची कार्यवाही आपल्या दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे त्वरेने करावी. पीक कर्जाचे शेतकर्‍याचे अर्ज १६ एप्रिलपासून बँकांनी स्वीकारावे. सोबतच पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना सहकार्य व सौजन्याची वागणूक देण्याबाबतही कृषिमंत्र्यांनी सूचित केले. या बैठकीस जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. अशोक खरात, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रमोद लहाळे, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी व अन्य अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.

शासकीय योजनांचे अनुदान लगोलग द्या!शासकीय योजनांचे अनुदानही लाभार्थींना त्वरित दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून अनुदान प्रलंबित राहणार नाही, याची काळजी बँकांनी घ्यावी. शौचालयाचे अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करावे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत खरेदी केलेल्या साहित्याचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर अदा केले जावे, असेही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या बैठकीत सूचित केले. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरkhamgaonखामगाव