मलकापूर (बुलडाणा): बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद मिरवित राज्यभरातील नागरिकांना अनेक गावोगावी पोहचविणारी एसटी बस वेगवेगळ्या प्रकारे असुरक्षतेच्या फेर्यात अडकली आहे. मलकापूर एस.टी. बसस्थानकामधील बसमध्ये प्रथमोपचार पेट्याही गायब झाल्याचे निर्दशनास येत आहे. मलकापूर आगारातील तसेच या ठिकाणी येणार्या काही बसेसमध्ये या पेट्या शाबुत आहेत मात्र त्यातील औषध व किट गायब असून पेट्या रिकाम्या आहेत. तर काही बसेसमध्ये पेट्या असून त्या पेट्यामधील औषध कालबाह्य झालेल्या आहे. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता सदर प्रथमोपचार पेट्यांच्या जागेवर आता नवीन किट आल्याचे सांगण्यात आले. परंतु किटचीही बहुतांश चालक व वाहकांना योग्य माहिती नाही. प्रथामोपचार पेट्यांना कालबाह्य ठरवित नवीन किट आणण्याची संकल्पना स्वहितार्थ असली तरी यातून कोणाताही मुळ हेतू साध्य होतांना दिसत नाही. ही प्रथमोपचार किट वाहकाजवळ असल्याचे सांगण्यात येते व वाहक चालकाजवळ असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात ही किट कुणाकडेही नाही. काहिंनी या किट सहा महिन्यापासून उघडल्याच नसून या किटमध्ये काय आहे ते सुध्दा आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे अशा किट मधील औषधी कालबाह्य असल्याची नाकरता येत नाही. आपातकालीन परिस्थितीत किंवा अपघातानंतर प्रत्येक प्रवाशाला आधार देणारे प्रचलित भाषेतील फस्ट अँड बॉक्स सध्या एसटीतून गायब झाले आहे.
एसटी असुरक्षिततेच्या फे-यात !
By admin | Updated: April 14, 2015 00:36 IST