शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.चा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

गतवर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकटामुळे एस.टी. महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ बसली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात ...

गतवर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकटामुळे एस.टी. महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ बसली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एस.टी.चे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूकही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एस.टी. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सलाच जास्त पसंती देत आहेत. एस.टी.पेक्षा ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याचा समज निर्माण होत आहे.

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

अलीकडच्या काळात खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ झाली आहे. बहुतांश अपघात खराब रस्त्यांमुळे होत असले, तरी याला वाहनधारकही तेवढेच जबाबदार आहेत; कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने पळविली जातात. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एस.टी.ला स्पीड लॉक, ट्रॅल्हल्स सुसाट

अपघात टाळण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसना स्पीड लॉक करण्यात आले आहे. यामुळे इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एस.टी. बसचे अपघात नसल्यासारखे आहेत. एस.टी.चा प्रवास खरोखरच सुरक्षित प्रवास आहे.

एस.टी. बसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसमध्ये या सुविधा प्रामुख्याने देण्यात येतात. एस.टी. बसमध्ये आरक्षणाची व्यवस्थादेखील आहे. प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घेऊन एसटी बसने प्रवास करावा.

-ए. यू. कच्छवे,

विभागीय वाहतूक नियंत्रण, बुलडाणा.

आराम महत्त्वाचा की सुरक्षित प्रवास ?

ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याला जास्त पसंती मिळते. मात्र एस.टी.चा प्रवास तेवढा आरामदायक नसला तरी सुरक्षित नक्कीच आहे. त्यामुळे आम्ही नेहमी ट्रॅव्हल्सऐवजी एस.टी. बसने प्रवास करतो.

- राजेंद्र पाटील, प्रवासी.

ट्रॅव्हल्सचे तिकीट एस.टी. बसच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास खूप खर्चिक आहे. एस.टी.चे तिकीट कमी असल्याने ते बजेटमध्ये आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी एस.टी. बसलाच पसंती देतात.

- विजय रहाणे, प्रवासी.