शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीमुळे एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक - ३४ वाहतूक सुरू असलेले ट्रक - ३४ कोरोनाकाळात महिन्याला २५ लाखांची कमाई १. बुलडाणा ...

जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक - ३४

वाहतूक सुरू असलेले ट्रक - ३४

कोरोनाकाळात महिन्याला २५ लाखांची कमाई

१. बुलडाणा विभागांतर्गत बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद हे सात आगार आहेत.

२. सातही आगार मिळून एकूण ३४ मालवाहतूक करणारे ट्रक असून, संपूर्ण ट्रकद्वारे मालवाहतूक सुरू आहे.

३. सध्या महिन्याला साधारणत: २५ लाखांची कमाई एसटी महामंडळ बुलडाणा विभागाची सुरू आहे.

परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

लांब पल्ल्यावर मालवाहतूक केल्यानंतर परतीसाठी मालवाहतुकीची ऑर्डर मिळेपर्यंत चालकाला त्याच ठिकाणी राहावे लागते. यात निवास, भोजनाव्यतिरिक्त वैयक्तिक खर्चही होत असल्याने चालकांना मोठा फटका बसत आहे.

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

मालवाहतूक ट्रकवरील चालकाला अंतर आणि मुक्काम या बाबी लक्षात घेऊन कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त १५०० रुपये ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्सची ही रक्‍कम चालकाच्या वेतनातून कपात केली जात आहे. त्यामुळे चालकांना मोठा फटका बसत आहे.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. लांब अंतरावरील मालवाहतूक करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यातच ॲडव्हान्स म्हणून अल्पशी रक्‍कम दिली जात असून, तीही पगारातून कपात केली जाते. त्यामुळे ही कोरडीच सेवा झाली आहे. ॲडव्हान्सची रक्कम वेतनातून कपात करण्यात येऊ नये.

एक चालक.

सध्या मोजक्याच बसफेऱ्या सुरू असल्याने महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळाला मालवाहतुकीतून चांगल्यापैकी उत्पन्न मिळत आहे. मात्र, मालवाहतुकीकरिता आम्हाला दिली जाणारी रक्‍कम वेतनातून कपात केली जात आहे. महामंडळाने ॲडव्हान्सची रक्‍कम कपात करू नये.

एक चालक.

चालकांना अगोदरच तुटपुंजे वेतन मिळते. मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असताना, चालक, वाहकांचे कुटुंबीय आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. महामंडळ तोट्यात आहे, हे मान्य असले तरी, सध्या विभागाला बऱ्यापैकी उत्पत्न मिळते. चालकांची ॲडव्हान्सची रक्‍कम वेतनातून कापू नये.

शेख उस्मान, प्रवासी सेवा संघटना.