शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

संगणकावर सॅनिटायझरची फवारणी करताय....सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:39 IST

Don't Spraying sanitizer on computer सँनिटायजरचा वापर करताना कर्मचाऱ्यांनी ते संगणकावर टाकू नये, असे निर्देश देण्याची वेळ या विभागावर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : काेरोना विषाणू प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या औषध फवारणीने जलसंपदा विभागावर नवेच संकट आेढवले आहे. या विभागाच्या कार्यालयांमध्ये केलेल्या फवारणीमुळे संगणक बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संगणकाच्या कोणत्याही भागावर सँनिटायजर किंवा औषधांची फवारणी न करण्याचा आदेशच विभागाच्या अवर सचिवांनी शुक्रवारी विभागाच्या सर्व संबंधितांना दिला.कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये सँनिटायजरचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. फवारणी करताना औषधी द्रव्य संगणकाच्या आतमध्ये गेले. त्यामुळे संगणक बंद पडल्याचा माहिती जलसंपदा विभागाकडे आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत फवारणी करणे, किंवा सँनिटायजरचा वापर करताना कर्मचाऱ्यांनी ते संगणकावर टाकू नये, असे निर्देश देण्याची वेळ या विभागावर आली आहे. संगणकाची सुरक्षा करण्यसााठी संगणक, माँनिटरवर फवारणी करणे किंवा सँनिटायजरचा वापर करण्यास जलसंपदा विभागाने बंदी घातली आहे. त्याबाबतचे पत्र विभागाचे अवर सचिव अ.वि.पगार यांनी सर्व संबंधितांना शुक्रवारी दिले आहे. 

संगणकावर फवारणीचा फटका शासकीय कार्यालयाच्या एखाद्या विभागात कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्यास त्या विभागात महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली जाते. त्याचवेळी काही कर्मचाऱ्यांनी संगणकावरही फवारणी करून घेतली. त्याचा फटका जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील संगणकांना बसला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव