शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सेवेमुळेच लाभते आत्मिक समाधान -पं. अनुराधा पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:02 IST

Pt. Anuradha Pal New आंतरराष्ट्रीय तबला वादक तथा पद्मश्री पं.अनुराधा पाल यांच्याशी साधलेला संवाद.

-  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : केवळ कोरोनाच नव्हेतर कोणत्याही आपत्ती आणि संकट काळात एकमेकांना साथ देणे, मदत करणं हीच शिकवण भारतीय संस्कृतीची आहे. या शिकवणुकीची जोपासना करण्यासाठी 'कला के संग'  हे देशव्यापी मदत अभियान राबविण्यात येत आहे. उस्ताद उल्लारखा खॉ यांच्या शिष्य,  आंतरराष्ट्रीय तबला वादक तथा पद्मश्री पं.अनुराधा पाल यांच्याशी साधलेला संवाद.

'कला के संग'  या अभियानाबाबत विस्तृत काय सांगाल?

कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे. अनेकांच्या नोकरी गेल्यात. काहींचा रोजगार बुडाला. कलाक्षेत्राचीही वाईट अवस्था झाल्याचे पाहून कलेची सेवा करणाऱ्यांना मदत देण्यासाठी, त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ह्यकला के संगह्ण अभियान सुरू केले. कलावंतासंह कलावंतांना साहाय्य करणाऱ्या परद्यामागील कलावतांनाही या अभियानातंर्गत मदत केली जात आहे.

'कला के संग' या अभियानातंर्गत किती कलावंताना मदत झाली?

ह्यकला के संगह्ण हे अभियान महाराष्ट्रासह देशातील विविध प्रमुख राज्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी आणि दुर्गम भागातील २७० पेक्षा अधिक कलावंत, वाद्यनिर्मिती करणारे कारागीर आणि त्यांच्या परिवाराला मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तानपुरा निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या सातारा जिल्ह्यातील मीरज, सांगली, गडचिरोली, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि आसाम, त्रिपुरा, गुजरात, केरळ या राज्यातील कलावंतांनाही मदत करण्यात आली.

सेवेच्या या उपक्रमाची संकल्पना कशी सुचली ?

आईचे वडिल पद्मश्री एम.टी. व्यास यांनी ८० एकर जमिन दान दिली होती. गोरगरीब, आदिवासी यांच्यासाठी ४० शाळा उघडल्या. तेच आपले प्रेरणास्त्रोत आहेत. त्यानंतर वडील देवेंद्र पाल, आई डॉ.इला व्यास यांचीही प्रेरणा आहे. पती श्याम शर्मा यांचे सेवा कार्यात सदैव सहकार्य आहे.

कोरोना काळात तसेच इतर उपक्रमाबाबत काय सांगाल?

सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रा सेवारत असलेल्या मुलीला पर्दमश्री एम.टी.व्यास स्मृती संस्कृती सेवा पुरस्काराने गतवर्षीपासून सन्मानित केले जात आहे. १ लक्ष ११ हजार १११ रूपयांचा पुरस्कार किसान विकास पत्रात डिपॉझिट करून दिल्या जात आहे. मार्च महिन्यात ५१ हजाराचा निधी पंतप्रधान मदत निधीला दिलाय. ऑगस्ट महिन्यात आंतराष्ट्रीय दर्जाच्या २७ कलावंतांच्या सहभागात देशातील एकमेव चार दिवशीय ऑनलाइन फेस्टीवल घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत