शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अवैध चराई प्रतिबंधासाठी ‘ज्ञानगंगा’त आता विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:22 IST

Gyanganga sanctury : २७ सदस्यांच्या या पथकाडे चार एलएलआर रायफल ही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यातील अवैध चराईला प्रतिबंध घालण्यासाठी तथा वन्य जीव कर्मचाऱ्यांवर होणारे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी मेळघाताली विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. २७ सदस्यांच्या या पथकाडे चार एलएलआर रायफल ही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुगामल आणि अकोट वन्यजीव विभागातून अतिरिक्त कुमक बोलवून हे दल अधिक सक्षम करण्यात आले आहे.ज्ञानगंगा अभयारण्यासह लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अलिकडील काळात वन कर्मचाऱ्यांवर अवैध चराई करणाऱ्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यात या लोकांना प्रतिबंध करण्यासोबतच वन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीकोणातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाेबतच वन कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखणे, अवैध चराई रोखणे हे प्रमुख उद्देश हे दल तैनात करण्यामागे आहे. दरम्यान अभयारण्याच्या परिसरात अवैधरित्या गुरांची चराई करण्यास प्रतिबंध व्हावा या दृष्टीकोणातून परिसरातील सर्व ग्रामपंचायत, गुरांचे मालक, गुराखी यांना अवगत करण्यात आले आहे. अवैध चराईचे प्रकार होत असल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशा स्वरुपाच्या सुचनाही दिल्या गेल्या आहेत. यासोबतच अवैध चराईचा बिमोड करण्यासाठी खामगाव वन्यजीव व वनपरीक्षेत्र अधिकारी एम. व्ही. धंदर तथा वन्यजीवचे वनपरीक्षेत्र अधिकारी डी. सी. लोखंडे यांनीही अशा व्यक्तींवर कारवाई करून या अवैध चराईस लगाम लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  शस्त्रे देऊन या दलाची ताकद वाढविण्यात आली आहे.क

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा