शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक वखरले!

By admin | Updated: July 1, 2017 00:00 IST

बुलडाणा : तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : वेळेपूर्वी आणि दमदार स्वरूपात होणाऱ्या पावसाने खरीप हंगाम मार्गी लागला असून, यावर्षी पावसाअभावी होणारी दुबार पेरणी टळली आहे. मात्र, सध्या बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर हळदीसारखे पिवळे पडून त्याची वाढ खुंटली असल्याने धाडनजीकच्या बोरखेड (धाड) या गावाच्या शेतकऱ्यांनी उभे सोयाबीन पीक वखरले आहे. खरीप हंगामात सर्व पीक परिस्थिती चांगली असताना सोयाबीन पिकावर संक्रांत आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिवळे पडल्याने शेतकरी हैराण झाला आहे. बोरखेड (धाड) येथील गजानन रामदास जाधव यांनी दोन एकर, रामदास कोंडुबा वाघ एक हेक्टर, रामदास बावस्कर एक एकर, संजय शिंदे एक एकर, तेजराव बावस्कर एक एकर, इचारे बावस्कर दोन एकर, संदीप बावस्कर एक एकर, असे अनेक शेतकऱ्यांनी पिवळे झालेले सोयाबीन वखरून टाकले, तर इतर शेतकरी सोयाबीनवर औषधी फवारून प्रतीक्षा करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनवर खोडमाशी व लोह कमतरेवर ट्रायझोफॉस ४० एमएल प्रती १० लीटर पाणी व फेरस सल्फेट १०० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी, चुन्याचे निवळीत वापरावे व फवारणी करावी. -सी.पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ