शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेले उगवलेच नाही;  बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का वाढेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:46 IST

बुलडाणा: पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सरासरी १ लाख ५७ हजार ६७६ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत २२ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जमिनीतील ओलाव्याअभावी अनेकांचे पेरलेले हरभरे उगवले नाही. यामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्काही वाढत नसल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातील प्रमुख आणि नगदी पीक असलेल्या हरभरा पिकावर यावर्षी सुरूवातीपासूनच संकट आले आहे. पावसाळ्यात पर्जन्यमान कमी राहिल्याने जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिला नाही. त्यामुळे सध्या शेतजमीनी कोरड्या असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामाची पीके घेण्यास अडचणी येत आहेत. बहुतांश शेतकºयांनी हरभरा पिकाची पेरणी केली; मात्र ओलीतीअभावी हरभरा निघाला नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात हरभरा पिकाचे क्षेत्र ६१ हजार २४८ हेक्टर आहे. त्यापैकी २० हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काहींचे हरभरा पीक निघाले नसल्याने शेतकºयांनी रब्बी पेरणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी होणाºया हरभरा पिकाची आतापर्यंत केवळ ३४ टक्के पेरणी झाली आहे. तर एकूण रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ५७ हजार ६६७ हेक्टर असताना जिल्ह्यात १५ टक्के म्हणजे २२ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. एकंदरीत यावर्षी  जिल्ह्यातील रब्बीची परिस्थिती चिंताजनक दिसून येत आहे.  

चारा पिकावरही दुष्काळजनावरांसाठी रब्बीमध्ये घेतल्या जाणाºया चारावर्गीय पिकावरही यावर्षी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अन्नधान्य आणि चारा पीक म्हणून महत्त्व असलेल्या ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ४५१ हेक्टर आहे. त्यापैकी ९६७  हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारीचा केवळ आठ टक्के पेरा झाला असल्याने चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. 

पावसाची ओढ रब्बीच्या मुळावर खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ रब्बीच्या मुळावर निर्माण झाली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनीही यावर्षी रब्बी हंगामाला शेवटपर्यंत पाणी पुरणार नाही, या भितीने पेरणी करण्याचे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट दिसून येत आहे. 

गहू पेरणी एक टक्क्यावरजिल्ह्यात हरभरा पिकापाठोपाठ गहू पिकाची पेरणी होते. गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०७ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ८३७ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत गहू पिकाची पेरणी करण्यता आली आहे. परतीच्या पावसाच्या भरवश्यावर अनेक शेतकरी कोरडवाहू शेतीतही गहू पीक घेतात. मात्र यावर्षी परतीच्या पावसानेही दगा दिल्याने जिल्ह्यात गहू पिकाची पेरणी केवळ एक टक्का झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती