शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा परिसरात पेरणीला सुरुवात; मृग नक्षत्राचा दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:58 IST

- काशिनाथ मेहेञेसिंदखेड राजा : मृग नक्षत्राच्या पावसाने मान्सूनपूर्वीच दमदार हजेरी लावल्यामुळे सिंदखेडराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मीमी पाऊस पडल्याची माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. सिंदखेड राजा येथे अनेक वर्षांपासून शेतकरी धूळ पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असत. परंतु निसर्गाचा लहरीपणा, ...

ठळक मुद्देयावर्षी मान्सूनपूर्वीच मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने सूरवात केली. त्यामुळे शेतकरी मशागतीला लागले आहेत. अनेक ठिकाणी कपाशी, मका, मूग, उडीद, सोयाबीनची लागवड व पेरणी करीत आहेत. पारंपारीक शेतीऐवजी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे.

- काशिनाथ मेहेञे

सिंदखेड राजा : मृग नक्षत्राच्या पावसाने मान्सूनपूर्वीच दमदार हजेरी लावल्यामुळे सिंदखेडराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मीमी पाऊस पडल्याची माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. सिंदखेड राजा येथे अनेक वर्षांपासून शेतकरी धूळ पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असत. परंतु निसर्गाचा लहरीपणा, बी -बियाणे, रासायनिक खतांच्या महागलेल्या किंमती यामुळे दुबार, तिबार पेरणीच्या संकटाने शेतकरी गार झाला होता. मात्र यावर्षी मान्सूनपूर्वीच मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने सूरवात केली. त्यामुळे शेतकरी मशागतीला लागले आहेत. अनेक ठिकाणी कपाशी, मका, मूग, उडीद, सोयाबीनची लागवड व पेरणी करीत आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, ऊडीद, हरभरा धान्याची आयात शासन मोठ्या प्रमाणात करते. शेतीमालाला मातीमोल बाजारभाव मिळून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  

शेडनेटकडे वळले शेतकरी

माळरानावर वसलेल्या नशिराबाद गावातील शेतकºयांनी पारंपारीक शेतीऐवजी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. मालास ऊत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव मिळत नसल्यामुळे गावातील ६० टक्के शेतकºयांनी शेड नेट शेतीचा प्रयोग राबविला. या माध्यमातून गावात आदर्श निर्माण केला. आदर्श शेतकरी दिलीप मेहेत्रे यांनी गेल्या दहा वर्षापूर्वीच शेडनेट शेतीचा प्रयोग सुरु केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ६० टक्के शेतकरी शेडनेटची शेती करुन लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहेत. इतर पिकांना फाटा देऊन तांत्रिक व आधुनिक शेतीकडे कल दिसून येत आहे.

असा झाला पाऊस

सिंदखेडराजा तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मिमी पावसाची नोंद झाली. २ जुन रोजी ८ मिमी पाऊस पडला. ३ जुन रोजी २२ मिमी, ६ जुनला ११ मिमी, १० जूनला ११ मिमी, ११ जुनला २२ मिमी पाऊस पडला. तालुक्यात एकुण ७४ मिमी पाऊस पडला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा