शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:01 IST

खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत ३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी असल्याचे चित्र आहे.यावर्षी जून अखेर खऱ्या अर्थाने दमदार पावसाचे आगमन झाले. तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. अखेर पावसाचे आगमन झाले, तेही दमदार स्वरूपात. पहिल्याच पावसाने शहरातील नाल्यांची पुरती वाताहात झाली. शहरातील सखल भागात पाणी शिरले. खामगाव शहराप्रमाणेच तालुक्यातही दमदार पावसाला सुरूवात झाली. सुरू झालेला पाऊस जरा उघडीप देईल; त्यानंतर पेरण्यांना सुरूवात करू, असा शेतकºयांचा बेत होता, मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेतांना दिसत नाही. प्रचंड पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अशाही अवस्थेत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. परंतु शेतात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. गत आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून पेरण्या उरकण्यासाठी शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतिक्षा करीत आहेत. खामगाव तालुक्यात ६ जुलै पर्यंत ६५ टक्के पेरण्या झाल्या असल्या, तरी अद्याप ३५ टक्के पेरण्या बाकी असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान जिल्ह्यात अनेक शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेती सुकत नसल्याचे दिसत आहे.यावर्षी चांगला पाऊस झाला. सध्या शेतात पाणी साचले असल्याने पेरणी करता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणी कण्यात येईल. पेरणी लांबली तरी हरकत नाही; परंतु चांगला पाऊस होणे आवश्यक आहे.-नितिन पालीवालशेतकरी, घाटपुरी ता. खामगाव.जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आणखी उघडीप दिल्यास येत्या ४ ते ५ दिवसांत उर्वरित पेरण्या पुर्ण होती.-नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊस