शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात ५५ टक्के क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:10 IST

बुलडाणा जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे. 

ठळक मुद्देज्वारी, मका पिकालाही प्राधान्य

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्‍या सुविधांमुळे शे तकर्‍यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या  पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के  क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.  गेल्या महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे खरीप हंगामातील  सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच एकाच वेळी कापूस,  सोयाबीन काढणीस आले होते. त्यामुळे मजुरांना मागणी वाढली होती. अनेक शे तकर्‍यांना वेळेवर मजूर मिळाले नसल्याने पीक जागेवरच पडून राहिले. त्यामुळे शे तकर्‍यांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी हा पाऊस  रब्बी हंगामासाठी आशादायी ठरला आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने व  हरभरा काढण्यासाठी लागणारा कमी खर्च गृहीत धरून शेतकरी हरभरा पिकाकडे  वळले आहेत. काही शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता असतानाही ते हरभरा पीक  घेत आहेत. कोरडवाहू व कमी पाण्यात पीक चांगले उत्पादन देते व बाजारातही भाव टिकून  असतात. यामुळेच शेतकर्‍यांचा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे.

चार्‍यासाठी ज्वारी, मक्याची लागवडकापूस, सोयाबीन काढणीनंतर यापूर्वी मका, ज्वारीचे पीक घेतले जात आहे; परंतु  मका, ज्वारी काढण्यासाठी मजूर नकार देत असल्याने केवळ चार्‍यासाठी ज्वारीची  पेरणी केली जात आहे; मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर धजावत नसल्याने व उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होत असल्याने केवळ चारा उपलब्ध व्हावा म्हणून ज्वारी पीक  घेतले आहे. इतर क्षेत्रावर हरभर्‍याची पेरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाणा  तालुक्यातील दत्तपूर येथील शेतकरी सुहास वानरे यांनी दिली. तर कमी पाण्यात उत् पन्न जास्त मिळत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरभरा पिकाची लागवड करीत  आहोत. यावर्षी ४0 एकरावर हरभरा पिकाची लागवड केली असल्याची माहिती  बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी दिली.

७३ हजार ९१0 हेक्टरवर हरभर्‍याची पेरणीरब्बी हंगामात जिल्ह्यासाठी हरभरा पिकाचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्राचे  नियोजन करण्यात आले होते. यापैकी ७३ हजार ९१0 हेक्टर क्षेत्र हे हरभर्‍यासाठी  राखीव होते. त्यापैकी ११ नोव्हेंबर पर्यंत ४0 हजार ५0२ हेक्टर क्षेत्रावर हरभर्‍याची  पेरणी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के हरभर्‍याची पेरणी पूर्ण झाली आहे. १३  तालुक्यापैकी सर्वात जास्त हरभरा पेरणी चिखली तालुक्यात १३ हजार ११,  बुलडाणा तालुक्यात १0 हजार २१३, त्यानंतर लोणार तालुक्यात ५ हजार ९२४  हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती