डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला येथील कृषीदूत मोहन भाकडे यांनी कृषी कार्यानुभव अंतर्गत राताळी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जमिनीची सुपिकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद ,पालाश , अन्नद्रव्य , विद्राव्यक्षाराचे प्रमाण आदिंची माहिती मिळते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खर्डे, विषय तज्ञ्ज प्रा. गोपाल बंद्रे यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल सराटे, अक्षय पाटील, गोपाल भाकडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कृषीदूतांनी दिले माती परीक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST