शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समाज भक्ती संप्रदायाकडे वळला- डहाकेवसंतराव डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:21 IST

बुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.

ठळक मुद्देमॉडेल डिग्री कॉलेजमध्ये रंगले संत साहित्यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे आयोजित भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून डॉ.सदानंद देशमुख, प्राचार्य डी.एम.अंभोरे, प्राचार्य नीळकंठ भुसारी, प्राचार्य राजाभाऊ हावरे, प्रा.प्रभाकर वारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंतराव डहाके  म्हणाले की, संतांचा मराठी साहित्यावर अंतरंगी आणि बाहय़रंगी प्रभाव आहे. यामुळेच संतांची ३00 वर्षांची परंपरा आजही टिकून आहे आणि पुढेही ही परंपरा टिकून राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले प्रा.सदानंद देशमुख आपल्या भाषणात म्हणाले भक्तीसंप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या गोष्टीचा विचार करताना लक्षात येते. आधीच्या बंदिस्त वेदकालीन संस्कृतीत सामान्य माणसांना लिहिण्या, वाचण्याची भक्तीची वाट मोकळी नव्हती. ज्ञानेश्‍वरांनी हा आत्मविश्‍वास पहिल्यांदा निर्माण केला. त्याचप्रमाणे महानुभाव वाड्मयाने सर्व जाती, धर्मातील स्त्री -पुरुषांना भक्तीच्या माध्यमातून लिहिण्या, वाचण्याचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे नंतर काळात मराठी साहित्यामध्ये कृषी साहित्य आणि विद्रोही साहित्य निर्माण झाले. परंपरेतील भालचंद्र नेमाडे, महांतरे यासारख्या लेखकांनी असले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून केले.  संत साहित्यातील वेदक अभिव्यक्तीमुळे दलित, पददलित समाजातील लेखक, कवींना विद्रोहाची वाट सापडली आणि नंतरच्या काळात प्रभावी साहित्य निर्मिती होत गेली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद गायकी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी साहित्याची गंगोत्री ही बुलडाणा जिल्हय़ातून झाली आहे. संत चोखामेळा, चक्रधर स्वामी, महदंबा या संतांची या जिल्हय़ाला मोठी परंपरा लाभली आहे. हीच परंपरा आजही टिकून असल्याचे गायकी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत सिरसाट यांनी केले. तर आभार प्रा.विनकर यांनी मानले.