शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश: वैद्यकीय सेवा मिळविताना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:25 IST

Khamgaon News : वैद्यकीय क्षेत्रात एकवाक्यता नसल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेचाला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्पदंश होणे ही दुर्घटना आहे; मात्र हा अपघात की नैसर्गिक घटना, यावर अद्यापही दुमत आहे. यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात एकवाक्यता नसल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेचाला सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या केस पेपरवर बरेचदा एमएलसी (मेडिकल लीगल केस) असा उल्लेख नसल्याने अडचण उद्भवत आहे.सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णाला उपचारासाठी दाखल करताना केस पेपरवर एमएलसी उल्लेख अपेक्षित असतो; मात्र अपघात की नैसर्गिक घटना, अशा द्विधा मानसिकतेमधील डॉक्टरांकडून अशी नोंद होत नाही. रुग्णांचे नातेवाईक जागरूक असले तर डॉक्टरांशी चर्चा करून तसा उल्लेख करून घेतात; मात्र बहुतेक घटना खेड्यातील व्यक्तींसोबत घडत असल्याने त्यांना यासंदर्भात ज्ञान नसते, तातडीने उपचार महत्त्वाचा असल्याने विचारणा करण्याची मानसिकता नसते. अशा वेळी रुग्णांचे केस पेपर एमएलसी उल्लेखाविनाच राहतात. जिल्हास्तरावरील अनेक शासकीय रुग्णालयांमधून सर्पदंशाच्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी रेफर करायचे असल्याने केस पेपरवर एमएलसीची नोंद आवश्यक ठरते.  अनेकदा रुग्णाला रेफर करताना एमएलसी नोंद नसल्यास अडचण येते. याबाबत धोरणात्मक निर्णय गरजेचा आहे.

असा आहे तांत्रिक पेच अचानक सापावर पाय पडल्याने तो डिवचला गेल्यास दंश करतो. अपघात जाणीवपूर्वक होत नाही, तसाच सर्पदंशही जाणीवपूर्वक करून घेतला जात नाही. तो सुद्धा अपघातच असतो. एखाद्याचा काटा काढण्याच्या हेतूने मुद्दाम सर्पदंश केला जात असल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात तपासानंतर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कायदेशीर अधिकार आहेत. विषारी सर्पदंशावर उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळे एमएलसी होणे आवश्यकच आहे. तो अपघातच मानला जावा. तांत्रिक अडचण येत असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना कॉल देण्याची गरज आहे.

टॅग्स :khamgaonखामगावsnakeसाप