ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. १७- जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, १५५५ शाळा मोबाइल ह्यडिजीटलह्य झाल्या आहेत. मोबाईल डिजीटलकडे शाळांचा ओढा वाढल्याने शिक्षकांच्या हातात खडूच्या एवजी आता 'स्मार्टफोन' दिसू लागले आहेत. मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांंना विविध संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या जात असून, शिक्षकांनी आतापर्यंत ४७७ शैक्षणिक व्हिडीओ तयार केले आहेत. शिक्षण विभागाने राज्यभरातील जिल्हा परिषद व प्राथमिक शाळांमध्ये मोबाइल डिजीटल शिक्षण उपक्रम हाती घेतला आहे.सुरूवातीला राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग १00 टक्के राबविण्यात आला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातही मोबाइल डिजीटल उपक्रम यशस्वीरित्या रुळला आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५५ शाळांमध्ये मोबाइलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांंना उत्तम शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांनी आतापर्यंंत ४७७ शैक्षणिक व्हिडीओ तयार केले आहेत. या उपक्रमात शिक्षकांजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने व शिक्षणासंबंधी विविध अँप्स डाऊनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्यात येते. जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, शिक्षकांजवळील स्मार्टफोन मध्ये ई- बालभारती सारख्या अनेक विविध पुस्तके डाऊनलोड करून डिजीटल शिक्षण देण्यात येत आहे.विदर्भात बुलडाणा जिल्हा यशस्वीविद्यार्थ्यांंमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, वर्गात त्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यांना डिजीटल संकल्पनेचा परिचय व्हावा, अशा उद्देशाने मोबाईल डिजीटल शाळा हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यांमध्ये डिजीटल शाळेचा प्रयोग यशस्वी केला आहे. लोकसहभागातून १४ लाख ७९ हजार निधी जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, बहुतांश शाळांमध्ये डिजीटल रुम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आयएसओ मानांकन प्राप्त शाळांची संख्या दोन आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर शाळांचीही आयएसओ मानांकनाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शाळा डिजीटल करण्यासाठी लोकसहभगाही महत्वाचा आहे. त्याकरिता लोकसहभागातून १0 हजार रुपयांपेक्षा अधिक निधी जमा करणार्या शाळांची संख्या १0९ असून, आतापर्यंंत जिल्ह्यात १४ लाख ७९ हजार २ रुपये निधी लोकसहभागातून प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, जि.प. शाळांमध्ये ह्यडिजीटल शिक्षणाची संकल्पना रुळली आहे. शिक्षकांकडून शिक्षणासंबंधी विविध अँप्स डाऊनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. -एन.के.देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
शिक्षकांच्या हातात खडूच्या एवजी ‘स्मार्टफोन’
By admin | Updated: February 18, 2017 03:17 IST