शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पंतप्रधान ‘आवास’ योजनेसाठी  साडेसहा हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:14 IST

- अनिल गवई खामगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका ...

- अनिल गवई

खामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले आहे.  खामगावातील १४०० घरकुलांचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, आणखी सहाशे घरांचा डीपीआर तयार झाला आहे. या योजनेतंर्गत खामगावात सर्वाधिक ६ हजार ४३६ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेत.

‘सर्वांसाठी घरे’ हे ब्रिद असलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ २५ जून २०१५ रोजी करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या लाभार्थ्यांसाठी चार भागांची वेगळी योजना असे या योजनेचे खास वैशिष्टे असून खामगाव शहरात २०१७- २०२२ पर्यंत ३५१९ घरकुलांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. खामगाव शहरातील घरकुलांच्या उभारणीसाठी मुंबई येथील देवधर असोसिएटस्ची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याअनुषंगाने या संस्थेने खामगावातील विविध भागाचे सर्वेक्षण करून सहा हजार ४३६ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतलेत. यापैकी तब्बल दोन हजारावर लाभार्थ्यांच्या अर्जातील त्रृटीपूर्ण करण्यात आल्या.  उर्वरीत लाभार्थ्यांच्या त्रृटींची पूर्तता करतानाच, टप्प्या-टप्प्याने घरकुलांचा डीपीआर पुढील मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पालिका प्रशासन सादर करीत आहे.

वर्गवारी निहाय घरकुलांसाठी प्राप्त अर्जांची आकडेवारी (खामगाव शहर)

आहे तेथेच घरकुल(स्लम रिडेव्हलेपमेंट)    ३,९७०    

भागीदारीतील घरे (एएचपी)    १,२७१

स्वत:च्या घरात वाढीव काम(बीएलसी)    १,१९५

एकुण प्राप्त अर्ज-    ६, ४३६        

 

जिल्ह्यातील तालुका निहाय घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट(सन २०२२ पर्यंत)

तालुका    घरकुल

बुलडाणा    २७८३

खामगाव    ३५१९

चिखली    २३४१

मलकापूर    २६७१

मेहकर        १६४२

नांदुरा        १६१२

शेगाव        २१६६

जळगाव जामोद    १०२६

देऊळगाव राजा    १११९

सिंदखेडराजा        ०५९६

लोणार        ०८५०

मोताळा    ०३७५

संग्रामपूर    ०२७०

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना