शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:24 IST

पुन्हा सहा जण कोरोना बाधीत आढळून आले असून बाधितांची संख्या १४८ वर पाहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १९ जून रोजी पुन्हा सहा जण कोरोना बाधीत आढळून आले असून बाधितांची संख्या १४८ वर पाहोचली आहे. यातील चार कोरोना बाधीत रुग्ण हे १८ जून रोजी रात्री उशिरा आढळून आले तर मलकापूर येथील दोन बाधीतांचा रिपोर्ट १९ जून रोजी सकाळी आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४८ आहे.अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या तब्बल १०३ अहवालांपैकी ९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सहा जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील ६० व ३८ वर्षीय पुरुषाचे आहे. दरम्यान एक २३ वर्षीय महिला ही पॉझिट्हि आली आहे. जळगांव जामोद येथील ५० वर्षीय पुरूष, शेगांव येथील ५८ वर्षीय महिला व नांदुरा येथील ४५ वर्षीय पुरुषांचा बाधितांमध्ये समावेश आहे.जिल्ह्यात सध्या सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली, दे.राजा तालुक्यात एकही अ‍ॅक्टीवह रुग्ण नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. दुसरीकडे आतापर्यंत ९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर आहे. सध्या जिल्ह्यात ४८ कोरोना बाधीत रुग्णांना बुलडाणा, शेगाव आणि खामगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.दुसरीकडे २,०४९ संदिग्धांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. १९ जून रोजी प्राप्त अहवालापैकी ९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा वाढता आकडा पाहता त्रिस्तरीय रुग्णालयाची रचना प्रभावीपणे कार्यान्वीत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १८ जून रोजीच जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीतून मदत करणाऱ्या तीन व्यक्तींच्या पुढाकारातून तब्बल ५४ आॅक्सीजन सिलींडर मिळाले आहेत. कोवीड हेल्थ सेंटरमध्ये ते देण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू होणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने सज्जता सध्या ठेवली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या