शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी पूर्ण; सोहळ्यात राहणार ४00 बुक स्टॉल!   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:29 IST

सिंदखेडराजा :  जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  असे सर्व कक्ष मिळून  दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होतो. यावर्षी जिजाऊ सृष्टीवरील  जिजाऊ जन्मोत्सव २0१८ ची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी दिली आहे, तसेच यावर्षी सर्व बहुजन बांधवांची,  जिजाऊ भक्तांची वाढती संख्या पाहता निवास व्यवस्था, पाणी व्यवस्था करण्यात आली  आहे. 

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा :  जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  असे सर्व कक्ष मिळून  दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होतो. यावर्षी जिजाऊ सृष्टीवरील  जिजाऊ जन्मोत्सव २0१८ ची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी दिली आहे, तसेच यावर्षी सर्व बहुजन बांधवांची,  जिजाऊ भक्तांची वाढती संख्या पाहता निवास व्यवस्था, पाणी व्यवस्था करण्यात आली  आहे. यावर्षी जन्मोत्सव सोहळ्यात बुक स्टॉलची संख्या ४00 असून, हॉटेलची संख्या १00  करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशभरातून बुक स्टॉल व हॉटेल स्टॉल  जिजाऊ सृष्टीवर येत असतात. आतापर्यंत हॉटेलचे स्टॉल सर्व बुकींग झाले असून, बुक  स्टॉलसुद्धा मोठय़ा प्रमाणात बुक झालेले आहेत. यावर्षी पार्कींग व्यवस्था वाढविण्यात  आली आहे. जिजाऊ सृष्टीवर बुक स्टॉलची उलाढाल करोडो रुपयात होत असते. यावर्षी  प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती  संभाजीराजे भोसले, शिवo्री स्वप्नील खेडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावर्षीचा  मराठा विधीभूषण पुरस्कार शिवo्री अँड.मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार शिवo्री  विजय तनपुरे, मराठा उद्योगभूषण पुरस्कार शिवo्री संजय वायाळ यांना देण्यात येणार  आहे, तसेच १0 जानेवारी रोजी मराठा समाजाकडून कुठल्याही प्रकारचा बंद राहणार  नाही, काही लोक अफवा पसरवत आहे, या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन  करण्यात आले. १२ जानेवारीला सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार असून,  अध्यक्षीय भाषण शिवo्री पुरूषोत्तम खेडेकर यांचे होणार आहे. तरी सर्व बहुजन समाज  बांधवांनी १२ जानेवारीला सिंदखेडराजाला यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी केले आहे. 

बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रमराजमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर ९  जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या  विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी जुन्या लोककला  विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा सेवा संघाचे  जिल्हा कार्याध्यक्ष  कैलासराव तायडे, पंकज देशमुख, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.  

टॅग्स :jijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा