शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : २५६ सदस्यांपैकी ६७ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:25 IST

सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये ३0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका  घेण्यात आल्या. जनतेमधून ३0 सरपंच पदासाठी व २५६ ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर  झोटिंगा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य अविरोध निवड  झाल्याची घोषणा करण्यात आली. तर २५६ सदस्यांपैकी ६७  सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदासाठी व १८९ सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली. 

ठळक मुद्देतालुक्यातील ३0 पैकी २९ ग्रामपंचायतींसाठी पार पडली  निवडणूकझोटिंग ग्राम पंचायत निवडणुकीपूर्वीच अविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यामध्ये ३0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका  घेण्यात आल्या. जनतेमधून ३0 सरपंच पदासाठी व २५६ ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर  झोटिंगा ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य अविरोध निवड  झाल्याची घोषणा करण्यात आली. तर २५६ सदस्यांपैकी ६७  सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यामुळे २९ ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदासाठी व १८९ सदस्यासाठी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीचे ९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर  करण्यात आले असून, सर्व प्रक्रिया शांततेने पार पडली.  निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांच्या  मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक नायब तहसीलदार सारिका  भगत यांच्या नियंत्रणामध्ये दहा निवडणूक निर्णय अधिकारी  नेमण्यात आले होते. प्रत्येक अधिकार्‍याकडे तीन ग्रामपंचाय तच्या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार एच.डी.  वीर, प्रीती जाधव, अस्मा मुजावर तसेच महसूल कर्मचारी, पा पुलवार, धोंडारकर, गीते, बंगाळे, कर्‍हाळे, गादेवाड, कुळकर्णी  यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेने पार  पाडली. ९ ऑक्टोबर रोजी निकाल ऐकण्यासाठी सिंदखेड राजा  येथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये ३0  ग्रामपंचायतचे सरपंच जाहीर होताच  विजयी उमेदवारांनी  गुलालाची उधळण करून वाजतगाजत जल्लोष करण्यात आला. पोलीस निरीक्षक बळीराम गीते, सहायक ठाणेदार संतोष नेमणार,  सहायक ठाणेदार शिवाजी शिंगणवाड व उपनिरीक्षक ८  अधिकार्‍यांसह १0४ पोलीस कर्मचारी ६६ होमगार्ड व १  एसआरपी रेक्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद  नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त होता.