शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुक्यात विहिरींनी तळ गाठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:20 IST

साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाखरखेर्डासह अनेक गावात पाणी टंचाई पाईप लाईनसाठी पाणी पुरवठा मंत्र्यांकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. विहिर अधिग्रहणासह टँकरचे प्रस्ताव ग्राम पंचायतीनी सादर केले असून यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.  कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. साखरखेर्डा येथे महालक्ष्मी तलावावरुन पाणी पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे कोराडी प्रकल्पावरुन सुध्दा पाणी पुरवठा होतो. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने महालक्ष्मी तलावात जेमतेम २५ टक्के पाणीसाठा जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असल्याने गावाला पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे. कोराडी प्रकल्पावरुन पाणी पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीसाठी किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु पाईप लाईन ही निकृष्ट दर्जाची असल्याने गावापर्यंत पाणी पोहचण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागणार आहे. कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. पिंपळगांव सोनारा येथेही यावर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील नळयोजनेला किमान ४० वर्ष पूर्ण झाले असून पाणी पुरवठा विहिरीत पाणी नाही जवळपास एकही तलाव नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव सरपंच तोताराम ठोसरे यांनी तहसिलदार आणि पंचायत समितीकडे पाठविला आहे. त्याच बरोबर गावात नविन नळयोजना प्रस्तावित करुन पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी प्रस्ताव आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचेकडे सादर केला आहे. या गावात आहे पाणी समस्यासिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव, शिंदी, राताळी, उमनगाव, दरेगाव, मोहाडी, तांदुळवाडी, काटेपांग्री, सावंगीभगत या गावातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही गावात टँकरची मागणी करण्यात आली असून विहिर अधिग्रहणाचे प्रस्तावही पाठविले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा