शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा ठरली आकर्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:42 IST

बुलडाणा : राजमाता माँ जिजाऊंच्या ४२0 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर  आकर्षक रोषणाई करण्यात येऊन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. परिसरातील महिला वर्ग सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर राजवाड्यासमोर जमून तेथे दीप प्रज्वलित करण्यात आले.

ठळक मुद्देशुक्रवार १२ जानेवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राजमाता माँ जिजाऊंच्या ४२0 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर  आकर्षक रोषणाई करण्यात येऊन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. परिसरातील महिला वर्ग सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर राजवाड्यासमोर जमून तेथे दीप प्रज्वलित करण्यात आले.यावेळी जिजाऊ मासाहेबांचा जयघोष करीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, कार्याध्यक्ष माधुरी भदाने, प्रदेश महासचिव पूनम पारसकर, प्रदेश कोषाध्यक्ष वनिता अरबट, जिल्हाध्यक्ष वनिता गायकवाड, तालुका अध्यक्ष ज्योती जाधव, जन्मोत्सव सचिव सुभाष कोल्हे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अँड. राजेंद्र ठोसरे, शारदा बावणे, डॉ. प्रिया हराळे, सीमा भालेराव, सरिता म्हस्के, अँड. उर्मिला हाडेंसह अन्य महिला यात सहभागी  झाल्या होत्या. राजवाड्याला प्रदक्षिणा घालून राजवाड्यासमोर यात्रेचा समारोप   झाला.

या मान्यवरांची राहणार उपस्थितीछत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यासह मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल.

सूर्याेदयी महापूजामराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्तेही सूर्याेदयी जिजाऊ जन्मस्थळी महापूजा करण्यात येणार आहे. ३२ कक्षांमधील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे. त्यानंतर वारकरी दिंडी निघेल. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर ध्वजारोहण होणार आहे.

नगराध्यक्षांच्या हस्ते पूजासिंदखेडराजा नगराच्यावतीने नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे यांच्या हस्ते  नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी जिजाऊ मासाहेबांची जन्मस्थळी पूजा होईल. त्यानंतर खा. सुप्रिया सुळे, छत्रपती आ. शिवेंद्र राजेंच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.

टॅग्स :jijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणा