शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद जन्मोत्सवाची साध्या पद्धतीने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

विवेकानंद जन्मोत्सवाची साध्या पद्धतीने सांगता : ७५ हजार दर्शकांची ऑनलाइन सोहळ्याला पसंती हिवरा आश्रम : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद ...

विवेकानंद जन्मोत्सवाची साध्या पद्धतीने सांगता :

७५ हजार दर्शकांची ऑनलाइन सोहळ्याला पसंती

हिवरा आश्रम : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमच्या कार्यकारी मंडळाने विवेकानंद जन्मोत्‍सव मर्यादित उपस्थित साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी भरगच्च भाविकांच्या उपस्थितीत व महाप्रसादाने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करीत साध्या पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सवाचा समारोप गुरुवारी करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्‍सव सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र यावर्षी अत्‍यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थित हा सोहळा विवेकानंद आश्रमात संपन्न झाला आहे. भाविकांसाठी विवेकानंद जन्मोत्‍सवाचे ऑनलाइन प्रसारण आश्रमच्या यू-ट्यूब,फेसबुकवर करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विवेकानंद आश्रमाने विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे ऑनलाइन प्रसारण होत आहे. विवेकानंद जन्मोत्सव भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातील जवळपास ७५ हजारहून अधिक दर्शकांनी ऑनलाइन पाहिल्याची माहिती विवेकानंद आश्रमचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. दि. २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान हा सोहळा भाविकांनी ऑनलाइन अनुभवला. विवेकानंद जन्मोत्‍सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा ऑनलाइन बघितला. विवेकानंद आश्रमाच्या अधिकृत यू-ट्यूब, फेसबुकवर एकाचवेळी लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. वर्षभरात विवेकानंद आश्रमात संपन्न होणारे विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रम नियमितपणे ऑनलाइन पार पडत असतात. विवेकानंद जन्मोत्‍सवाच्या तीनदिवसीय कार्यक्रमांचे ऑनलाइन प्रसारण करण्यात आले होते.