शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांना महिन्याला हवे १५० बॅग रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 11:48 IST

Blood Bank : कोरोना काळातही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वेळेवर रक्त देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत करण्यात आलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सिकलसेल, थॅलेसेमिया व हिमोफेलियाचे एकूण १७३ रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे असते. त्यांना महिन्याला १५० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना काळातही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वेळेवर रक्त देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा भासतो. यामध्ये प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यातील अवस्था अतिशय बिकट असते. विविध सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या शिबिरांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांना रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिक रक्तदानासाठी समोर येत नाहीत. त्यामुळे नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. सिकलसेलच्या रुग्णांना दर दोन ते तीन महिन्यांनी तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना दर २१ दिवसांनी नियमित रक्तांची आवश्यकता भासते. हिमोफेलियाच्या रुग्णांनाही ठरावीक कालावधीनुसार रक्त चढविणे गरजेचे असते. जिल्ह्यात सध्या थॅलेसेमिया १०७, सिकलसेल ६३ तर हिमोफेलियाचे ३ रुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण स्थानिक शासकीय रुग्णालयांमधून रक्त घेतात.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या २०० बॅग रक्तसाठा उपलब्ध आहे. यामुळे उपरोक्त सर्व आजाराच्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करणे शक्य होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. 

जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीसह जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. रक्तपेढीत जमा करण्यात आलेले रक्त केवळ ३५ दिवसांपर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे एकाच दिवशी रक्तदान शिबिर न घेता योग्य नियोजन करून आठवडा किंवा पंधरवड्याच्या फरकाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.-डॉ. ज्ञानेश्वर राऊत, रक्त संक्रमण अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा

टॅग्स :khamgaonखामगावBlood Bankरक्तपेढी