शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:30 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्‍चितीवरून विवेकानंद आश्रमचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या विरोधात अंनिसचे श्याम मानव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत  स्थानिक आश्रमाच्या प्रांगणात मानव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे गुरुवारला दहन करण्यात आले.

ठळक मुद्देहिवरा आश्रम येथे श्याम मानव यांच्या वक्तव्याचा निषेध विविध स्तरातून कारवाई करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्‍चितीवरून विवेकानंद आश्रमचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या विरोधात अंनिसचे श्याम मानव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत  स्थानिक आश्रमाच्या प्रांगणात मानव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे गुरुवारला दहन करण्यात आले.साहित्य संमेलनाच्या स्थळाबद्दल अंनिसने बिनबुडाचे आरोप करीत शुकदास महाराज यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करून साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्टंटबाजी लावली आहे, असा आरोप करत स्थानिक व परिसरातील नागरिकांनी गुरुवारला दुपारी आश्रम परिसरात श्याम मानव यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी प्रशांत बोरे, प्रकाश म्हस्के, स्वप्निल गाभणे, अमोल म्हस्के, अंकुश महाकाळ, योगेश तोडकर, रवी जाधव, प्रवीण जाधव, शांताराम धंदर, सोनू नवघरे, बाबू कांबळे, भय्या धायडे, पवन शेळके, विशाल शेळके, शुभम वानखेडे, शिव म्हस्के, सुजित शेळके व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कारवाईची मागणीअंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी विविध वाहिन्यांद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे शुकदास महाराज व महिला वर्ग आणि विवेकानंद आश्रमावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांनी बेताल विधाने करू नयेत, तसेच श्याम मानव यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी  हिवरा आश्रम ग्रामपंचायतच्या वतीने मेहकर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलडाणा जिल्हय़ात हिवरा आश्रम येथे प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याने साहित्य रसिक सर्वत्र आनंदोत्सव साजरा करीत आहेत; मात्र  दुसरीकडे श्याम मानव हे या स्थळाबद्दल बिनबुडाचे आरोप करून विरोध दर्शवित आहेत. केवळ पब्लिसिटीसाठी श्याम मानव हे महिलांचा अवैध संबंध जोडून विवेकानंद आश्रमाला नाहक बदनाम करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून विख्यात असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील माता, भगिनींचा बेताल वक्तव्य करून श्याम मानव हे स्त्रीशक्तीचा अवमान करीत आहेत, त्यांचे वक्तव्य महिलांचे चारित्र्य हनन करणारे आहे, असा आरोप करून विवेकानंद नगर ग्रामपंचायतच्यावतीने निवेदनातून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या निवेदनावर सरपंच निर्मला मुंगशीदेव डाखोरे, उपसरपंच प्राजक्ता नितीन इंगळे, माजी उपसरपंच मालता संजय वडतकर, निर्मला मनोहर गिर्‍हे, रेखा अशोक लहाने, द्वारका दामोधर गारोळे, अस्मिता राजेश ठाकरे, मधुकर  धोंडुबा शेळके, विठ्ठल प्रभाकर भाकडे, प्रशांत तोताराम बोरे, गजानन शिवाजी कंकाळ यांच्या सहय़ा आहेत. 

श्याम मानवांना मातृतीर्थ जिल्हय़ात येऊ देणार नाही - शिवदास रिंढेहिवराआश्रम: दगडात देव नाकारून आयुष्यभर वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालणार्‍या शुकदास महाराज यांना बदनाम करून त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचा श्याम मानव यांनी  सपाटा लावला आहे, त्यामुळे श्याम मानव यांना मातृतीर्थ जिल्ह्यात येऊ देणार नाही, असा इशारा सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी १४ सष्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिला आहे. पुढे बोलताना रिंढे म्हणाले की, अंधश्रद्धेवर आघात करण्याचे काम सुरुवातीपासूनच शुकदास महाराजांनी केलेले आहे, हे सहन होत नाही म्हणून की काय, गेल्या काही काळापासून श्याम मानव हे शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाला विरोध करीत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या १३0 वर्षाच्या काळात मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला प्रथमच हिवरा आश्रमच्या रूपाने यजमान पदाचा मान मिळाला आहे. हिवरा आश्रम या स्थळाची घोषणा होताच बुलडाणा जिल्ह्यातील साहित्य रसिकांमध्ये आनंदाची लाट उसळली. गावागावातील पारावरच्या गावगप्पांपासून शहरातल्या चौकाचौकात संमेलनाचाच विषय चर्चिला जात आहे. शुकदास महाराज स्वत: साहित्यिक होते. आपल्या अनुभूती ग्रंथातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केलेला आहे. हे श्याम मानव यांनी लक्षात घ्यावे आणि शुकदास महाराजांवर बिनबुडाचे आरोप करणे बंद करावे, असेही रिंढे यावेळी म्हणाले. तसेच श्याम मानव यांनी शुकदास महाराजांवर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांचा रिंढे यांनी निषेध केला व साहित्य संमेलनास विरोध करून अडथळा निर्माण केल्यास मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात श्याम मानव यांना पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शिवदास रिंढे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

हिवरा आo्रम येथे साहित्य संमेलन हा जिल्हय़ाचा स्वाभिमान - दत्ता खरातचिखली: अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवरा आo्रम येथे होणे हा जिल्हय़ाचा स्वाभिमान असून, हे संमेलन विदर्भात होत असल्याने अंनिसच्या माध्यमातून त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न विदर्भवासीयांनी हाणून पाडावा, असे आवाहन दत्ता खरात यांनी केले आहे. शुकदास महाराजांनी वेदांत आणि विज्ञानाची सांगड घालून कृषी, आरोग्य, धार्मिक आणि शैक्षणिक बाबतीत हिवरा आo्रमाची ख्याती निर्माण केली. दगडाचा देव नाकारून चालत्या-बोलत्या माणसात देव शोधण्याचे कार्य त्यांनी अहोरात्र केले आहे. अंधo्रद्धा निर्मूलनाच मार्ग शेवटपर्यंत अंगीकारून लोकोपयोगी उपक्रम राबविले. मग अंधo्रद्धेचा पोटशूळ का, असा सवाल खरात यांनी उपस्थित केला आहे. तर संत चोखामेळा यांच्यापासून ताराबाई शिंदे, अमृतराय, o्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ना.घ. देशपांडे, सदानंद देशमुख, अजिम नवाज राही यांच्यापर्यंत जिल्हय़ात सकस साहित्याची दैदीप्यमान परंपरा लाभली आहे. त्यामुळे साहित्य संमेलन बुलडाणा जिल्हय़ाच्या दिशेने जात असताना त्याचा अटकाव करणे शक्य झाले नाही म्हणून वड्याचे तेल वांग्य़ावर घालून आतली पराभूत खळखळ अभिव्यक्त करण्यासाठी अंनिसच्या माध्यमातून काळाच्या उदरात गडप झालेल्या शुकदास महाराजांवरील बिनबुडाच्या आरोपांचे घोडे पुढे रेटले आणि स्वत:चे हासे करून घेतले; परंतु अंनिसचा डाव विदर्भवासीय तथा बुलडाणा जिल्हावासीयांनी हाणून पाडावा, असे आवाहन दत्ता खरात यांनी केले आहे.