शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खामगावात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात

By अनिल गवई | Updated: September 17, 2024 13:13 IST

खामगावात चोख पोलिस बंदोबस्त : लाकडी गणेशाचे आगमन झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ

अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घरगुती गणेशाचे पहाटेपासून तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला  मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी ९.२५ वाजता  फरशी येथून सुरुवात झाली.

येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २९ श्री गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. मिरवणुकीत गांधी चौकातील वंदे मातरम मंडळाने यंदा प्रथमच सादर केलेल्या  हरियाणा हिस्सार येथून बाहुबली हनुमान व शिव तांडव नृत्य पथकाने  हा देखावा अबालवृद्धांची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.  या देखाव्यासह  विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले.  श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  खामगाव शहरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मान्यवरांकडून मानाच्या गणपतीचे पूजनसकाळी ९: १५ वाजता अय्याची कोठी येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात आली. आरतीनंतर लाकडी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मानाचा लाकडी गणेश फरशी येथे पोहोचल्यानंतर खामगावातील एकापाठोपाठ गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालीत. लाकडी गणेशाच्या आरतीला जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात,  लाकडी गणेश मंडळाचे अध्यक्ष  सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर.बी. अग्रवाल, डॉ. अनिल चव्हाण, संजय झुनझुनवाला यांच्यासह मान्यवरांनी आरती केली. फरशी येथे मिरवणूक आल्यानंतर खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर मिरवणुकीत सहभागी झाले.  यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त प्रभारी पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर, शहर पोलीस निरिक्षक रामकृष्ण पवार, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पितांबर जाधव, व्ही.वाय.देशमुख आदी उपस्थित होते. मिरवणुकीत मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिस?्या स्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध गणेश मंडळांच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिक सादर केले. तर वंदे मातरम मंडळाचा गणपती सकाळी १० वाजता मिरवणुकीत सहभागी झाला. वंदेमातरम मंडळाच्या अघोरी नृत्याने मिरवणुकीत चांगलाच रंग भरला.

टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४