शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

 श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:12 IST

शेगाव :  'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देयागाची पूर्णाहूती व अवकृतस्नान कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (व्यवस्थापकीय विश्वस्त, गजानन महाराज संस्थान) यांच्याहस्ते झाली. ह.भ.प. श्रीरामबुवा ठाकूर यांचे सकाळी १० ते १२ किर्तन झाले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या उत्सवात राज्यभरातील तब्बल  एक हजाराच्यावर  दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे.

शेगाव :  'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रकट दिन बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षिने उत्साहात साजरा करण्यात आला. यागाची पूर्णाहूती व अवकृतस्नान कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील (व्यवस्थापकीय विश्वस्त, गजानन महाराज संस्थान) यांच्याहस्ते झाली. ह.भ.प. श्रीरामबुवा ठाकूर यांचे सकाळी १० ते १२ किर्तन झाले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 

या प्रकटदिनोत्सवाला १ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, असून याअंतर्गत दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत.  या प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल  एक हजाराच्यावर  दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे. दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी १२ वाजता गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पुणार्हूती संपन्न झाली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, रमेश डांगरा, गोविंद कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, चंदूलाल अग्रवाल, प्रमोद गणेश आदी उपस्थित होते. संस्थानच्यावतीने २ लाखावर भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आले. नागपूर टिमकी श्रीभक्त मंडळाच्या वतीने वारकºयांचे पादत्राणे विनामुल्य ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

श्रींची भव्य नगर परिक्रमाश्रींच्या १४० व्या प्रकटदिनी श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता रथ, मेणा, गज अश्वासह  नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींची पालखी दत्तमंदिर, हरहर शिवमंदीर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे पकटस्थळ, श्री मारोती मंदीर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे श्रींची पालखी काढण्यात आली. शिवमंदीर, श्री प्रकटस्थळ, श्री मारोती मंदीर येथे विश्वस्तांच्याहस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शहर ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने चहा, नाश्टा, फराळ, व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला.  वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पार्किंग व्यवस्थाही शहरात ठिकठिकाणी कर्म्याट आली होती. दिंड्यांच्या आगमनामुळे विदर्भपंढरीत भक्तीमय वातावरण झाले होते.

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरbuldhanaबुलडाणा