शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरकप स्पर्धेसाठी जीएसटी अधिकाऱ्यांनी परिवारासह केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 18:47 IST

धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले.  टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान ...

ठळक मुद्दे टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली.सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेले आहे.

धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले.  टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले. खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली. त्यांच्या सोबत जीएसटीचे अधिकारीही होते. दरम्यान, सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेले आहे. येथे सध्या श्रमदानाची चळवळ ही लोकचळवळ बनत आहे. त्यात मोठे अधिकारीही सहभागी होत असून श्रमदान करण्यासाठी आकर्षिल्या जात आहे. सिंदखेड येथील ग्रामस्थही सध्या झपाट्याने श्रमदान करीत आहेत. जीएसटीचे डेप्यूटी कमिशनर टी. के. पाचरणे, त्यांची पत्नी साधना आणि मुलेही तळपत्या उन्हात सिंदखेड येथे या श्रमदान सहभागी झाले. त्यांच्या सोबत महिला अधिकारी कुम्बरे, तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण विठोरे, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर, गोपाल पवार, अमोल तायडे, बोराडे आणि धंदर सहभागी झाले होते. दरम्यान, श्रमदान स्थळी पाण्याचे महत्त्व विषद करणारी पाण्याच्या थेंबाची मोठी रांगोळी पाणी फाऊंडेशनच्या वतीने एक एकर जागेमध्ये राजू कोल्हे यांनी काढली. श्रमदानस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गोरोबा काका यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदान बनली चळवळ सिंदखेड गाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाले असून येथे श्रमदान ही एक चळवळ बनत आहे. श्रमदानासाठी आलेल्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी रात्री ग्रामपंचायतीमध्ये मुक्का केला होता. अमेरिकेला स्थायिक झालेल्या सिंदखेड येथील जितेंद्र गडाख या युवकानेही श्रमदानासाठी गावात मुक्काम वाढवला. आजारी असतानाही जिल्हा परिद सदस्य अ‍ॅड. गणेशसिंह राजपूत श्रमदानासाठी सरसावले होते तर ग्रामसेवक राजेंद्र वैराळकर हे सध्या या मोहिमेत चांगला समन्वय ठेऊन आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाGSTजीएसटी