शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना मिळणार कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:23 IST

कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कृषी क्षेत्रावर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी शेती कसण्यासाठी आर्थिक मदत पीक कर्जाच्या स्वरूपात झाली पाहिजे. बँकांनी पिक कर्ज देताना कुठलेही आढे-वेढे न घेता शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दिलेला कर्जाचा सिबील स्कोर गृहीत धरू नये, कमी पिक कर्ज वितरण असलेल्या बँकांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवाव्यात, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पिक कर्ज वितरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विनोद मेहेरे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मोहन चांगदे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारूकी, माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.भारतात हरीत क्रांती ही बँकांमुळे झाली असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, बँका शेतकºयांच्या दारापर्यंत गेल्यामुळे शेतीला अर्थसहाय्य मिळाले. परिणामी, कृषी उत्पादन वाढून हरीत क्रांती झाली. अशाचप्रकारची हरीत क्रांती आता करायची आहे. बँकांनी प्रत्येक ब्रँचमध्ये पिक कर्ज वाटप सुरू असल्याचे फलक लावावे. पात्र असलेल्या शेतकºयांना वाढीव कर्ज द्यावे. त्यांच्याशी सौजन्याने वागावे. आपली नैतिक जबाबदारी ओळखून बँकांनी पिक कर्जाचे वितरण करावे. पिक कर्ज वितरणासाठी तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांनी नियमितपणे आढावा घेतला पाहिजे. प्रकरणनिहाय बँकाकडून निकाली काढून शेतकºयाला पिक कर्ज मिळून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे बँकांनी त्यांच्याकडील शेतकरी खातेदारांचे ‘मल्टी बँकींग फायनान्स’ घेतलेल्या शेतकºयांच्या याद्या तयार कराव्यात. ते पुढे म्हणाले, क्षेत्रिय व्यवस्थापकांनी आपल्या बँक व्यवस्थापकांचा नियमित आढावा घेवून कमी वितरण असलेल्या शाखांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी बँक निहाय पीक कर्ज वितरण, पीक कर्जमाफीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला राष्ट्रीय कृत बँका, खाजगी व व्यापारी बँक, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, कृषि व सहकार विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘पीक कर्जासाठी कागदपत्रांची मागणी करू नये’पिक कर्ज हे नजर गहाणचा विषय असल्यामुळे कागदपत्रांची मागणी करू नये. अनेक बँका पीक कर्जासाठी अन्य बँकांचे ना हरकत प्रमाणपत्र मागतात. ते मागण्याची आवश्यकता नाही. विविध बँकांनी शेतकºयांसाठी पिक कर्जामध्ये हेअर कटची सुविधा दिली आहे. शेतकºयांना याचा लाभ देण्यात यावा. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २३ हजार पात्र शेतकरी खातेदारांना वर्ग करण्यात आलेल्या याद्यांप्रमाणे पिक कर्ज वितरणाचा लाभ देण्यात यावा, अशा सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) किशोर तिवारी यांनी दिल्या.

टॅग्स :Kishor Tiwariकिशोर तिवारीCrop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी