शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड केंद्रावर मोजमापात घोळ, शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 23:27 IST

शेगाव : उडीद, मूग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदी केंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला.

- विजय मिश्राशेगाव : उडीद, मूग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदी केंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.मंगळवारी नाफेड केंद्रावर अनेक शेतक-यांनी उडीद, मूग विक्रीसाठी आणले. संध्याकाळ झाली तरी खरेदीचा पत्ता नव्हता. शेतक-यांची २०० ते ३०० वाहने उभी असताना अचानक खरेदीस सुरुवात झाली. मध्येच एकाचा ट्रॅक्टर आत घेण्यात आला. त्यामुळे शेतक-यांनी माहिती काढली असता तो ट्रॅक्टर व्यापा-याचा निघाला. त्यामुळे शेतक-यांनी एकच गोंधळ केला. या प्रकाराची माहिती नाफेडच्या अधिका-यांना दिल्यानंतरही ते ऐकून घेण्यास तयार नव्हते, असा आरोप शेतक-यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती तहसीलदारांना मिळाल्याने त्या ठिकाणी नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी, बाजार समिती सचिवाने धाव घेतली. शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही शेतक-यांना मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.तो ट्रॅक्टर श्रीराम इस्टेटचा१३ डिसेंबर हा माल खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी झाली होती. याठिकाणी श्रीराम इस्टेटचे गोडावून आहे. तेथून ट्रॅक्टरमध्ये उडिदाचा माल भरण्यात आला. मध्येच शेतक-यांच्या रांगेत ट्रॅक्टर उभा करण्यात आला. त्यामुळे हा गोंधळ उडाला.शेतक-यांचे नोंदवले बयाणमंडळ अधिकारी आर. बी. दीक्षित, पुरवठा अधिकारी चांभारे यांनी शेतक-यांचे बयाण नोंदवले. यामध्ये सैय्यद साजिद सैय्यद साबिर (मनसगाव), विनायक देवीदास फाटे (पहुरजीरा), संतोष ताराचंद चांडक (हाता), गोपाल पांडुरंग आखरे, वि. के. कंकाळ (मनसगाव) आदी शेतक-यांचा समावेश आहे.झालेल्या प्रकाराबाबत आम्ही निश्चित चौकशी करू. यासाठी नाफेड केंद्र प्रमुखांना सांगितले आहे. शेतकºयांची तक्रार आम्ही घेतली आहे. - आर. बी. दीक्षित (मंडळ अधिकारी)

टॅग्स :Marketबाजार